शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

मुंबई – सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी दिलेले निमंत्रण भाजपने नाकारले आहे. भाजपच्या कोअर कमिटीने राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आपला निरोप कळवला. शिवसेनेची सोबत येण्याची इच्छा नसल्याचे सांगत भाजपने असमर्थता दर्शवली. आता शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करायचा झाल्यास त्यांच्यासमोरही संख्याबळाची जुळवाजुळव करण्याचे आव्हान असेल. त्यापूर्वी शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

‘लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा-शिवसेना युतीचा फॉर्म्युला ठरला होता. मात्र शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न झाला. अशा वातावरणात काम करणे शक्य नाही. त्यामुळं मी आपल्या केंद्रीय अवजड उद्योग मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. राजीनामा पंतप्रधानांकडे पाठवला असून, यावरून तुम्ही युती आहे की नाही याचा अर्थ लावू शकता’, असे अरविंद सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

तसेच आज सकाळी त्यांनी ट्विटरवरुन आपल्या राजीनाम्याबाबत घोषणा केली. ‘शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का रहायचे?आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे’ अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.

‘लोकसभा निवडणुकीआधी जागावाटप आणि सत्तावाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता. आता हा फॉर्म्युला नाकारुन शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे. असे अरविंद सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

अरविंद सावंत हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर खासदारपदी निवडून आले आहेत. मोदी 2.0 सरकारमध्ये सावंत यांना अवजड उद्योग मंत्रालय सोपवण्यात आले. शिवसेनेच्या वाट्याचे हे एकमेव केंद्रीय मंत्रिपद आहे. पहिल्या मोदी सरकारमध्येही हेच खातं शिवसेनेला मिळाले होते. त्यावेळी अनंत गिते या मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होते.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

Live राजकीय घडामोडी

१५.३० – राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव १५.०० – राज्यपालांकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस १४.४९ – राष्ट्रवादीकडे बहुमत नाही; काँग्रेससह शिवसेना सोबत आल्यानंतरच सरकार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव

मुंबई – राज्यावर राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली सुरू असतानाच शिवसेनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शिवसेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी त्यास...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते शरद पवारांना सायंकाळी ५ वाजता भेटणार

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आज रात्री ८.३० वाजेपर्यंत वेळ दिली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र राजकीय

साडे आठ वाजण्यापूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई – तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. ही वेळ संपण्यापूर्वीच राज्यपाल...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आशिष शेलार म्हणतात, ‘संजय राऊतांनी कमी बोलावे’

मुंबई – एकीकडे सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना लीलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजपा नेतेही दाखल...
Read More