अंगणवाडी सेविकांना लावलेल्या मेस्मा कायद्यावरून विधानसभेत गदारोळ – eNavakal
मंत्रालय महाराष्ट्र

अंगणवाडी सेविकांना लावलेल्या मेस्मा कायद्यावरून विधानसभेत गदारोळ

मुंबई –  विधानसभेत अंगणवाडी सेविकांना लावलेला मेस्मा कायदा मागे घेण्याची मागणी करत शिवसेना आणि राष्ट्रवादीने गोंधळ घातला.हा गदारोळ सुरू असतानाच शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सभागृहातील राजदंड पळवला.

सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यापासून जोपर्यंत मेस्मा रद्द केला जात नाही, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही अशी आक्रमक भूमिका  विरोधी पक्षांनी घेत विधानसभेत गदारोळ घातला. या गोंधळामुळे सकाळच्या सत्रात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तहकूब केले मात्र त्यानंतर कामकाज सुरू होताच पुन्हा एकदा या प्रश्नावरून गोंधळ सुरू झाला. त्याचवेळी शिवसेनेचे आमदार चौगुले यांनी विधानसभा अध्यक्षांसमोरील राजदंड पळवला.

त्याआधी सरकार लोकशाहीची गळचेपी  करत असून त्यांची हुकूमशाही प्रवृत्ती सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला. अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावायचा असेल तर त्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याची मागणी शिवसेनेने केली तर मेस्मा कायदा मागे घेतल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू न देण्याची भूमिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. या मागणीसाठी आक्रमक झालेले आमदार सभागृहाच्या वेलमध्ये उतरले होते. त्यातच पंकजा मुंडेंनी  मेस्मा कायदा मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली त्यामुळे गोंधळात भर पडली. अखेर विधानसभा अध्यक्षांनी काही काळासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

शक्ती मिल बलात्कार प्रकरण! हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा गुन्ह्यात फाशी नाही, तर बलात्कारात का?

मुंबई- एखाद्याची हत्या करणे अथवा शरीराचा एखादा भाग धडापासुन वेगळा करणे अशा अमानवी स्वरूपाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षेची तरतूद नाही . त्या मुळे हत्ये पेक्षा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसईत बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प

वसई – बीएसएनएलच्या इंटरनेटचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्यामुळे वसईतील दस्त नोंदणी रखडत चालली असून त्याचा फटका मात्र दररोज नोंदणी कार्यालये व त्याच्या लाखो...
Read More
post-image
News मुंबई

पालिकेचा केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ पुरस्काराने सन्मान

मुंबई – पालिकेद्वारे नागरिकांना देण्यात येणार्‍या विविध सेवा सुविधा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, विविध परवानग्या, दाखले, अनुज्ञप्ती पत्रे यासारख्या सेवा सुविधा माहिती...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पालिकेच्या रुग्णालयातील एक्स-रे मशीन कोमात

वसई- वसई-विरार महापालिकेच्या नालासोपार्‍यातील रुग्णालयाची एक्स-रे मशीन महिनाभरापासून नादुरुस्त असून आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे गोरगरीब रुग्णांना हजारो रुपयांचा भुर्दंड हकनाक सोसावा लागत आहे. नालासोपारा पुर्वेकडील...
Read More
post-image
News विदेश

‘जैश’चे मुख्यालय पाकिस्तानने घेतले ताब्यात

इस्लामाबाद – भारताच्या कारवाईच्या भीतीने पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय ताब्यात घेतले आहे. मौलाना मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय बहावलपूरमध्ये आहे. पंजाब सरकारने हे मुख्यालय ताब्यात घेतल्याची...
Read More