शिवडीमध्ये ट्रेलरच्या धडकेने वयोवृद्ध महिलेचा मृत्यू – eNavakal
News मुंबई

शिवडीमध्ये ट्रेलरच्या धडकेने वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

मुंबई,- शिवडी येथे ट्रेलरच्या धडकेने एका 77 वर्षीय वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला. सुशिला काशिनाथ धुमाळ असे या मृत वयोवृद्धेचे नाव असून अपघातानंतर ट्रेलरचालक पळून गेला आहे. त्याच्याविरुद्ध आरएके मार्ग पोलिसांनी हलगर्जीपणाने ट्रेलर चालवून एका वयोवृद्धेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी अकरा वाजता शिवडी येथील झकेरिया बंदर रोड, बीडीडी चाळ क्रमांक चारजवळील उत्तर वाहिनीवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
मंगळवारी सकाळी सुशिला धुमाळ या झकेरिया बंदर रोडवरून पायी जात होत्या. यावेळी तेथून जाणार्‍या एका टाटा कंपनीच्या ट्रक-ट्रेलरने त्यांना धडक दिली होती. या अपघातात त्या गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या. मात्र त्यांना कुठलीही वैद्यकीय मदत किंवा पोलिसांना अपघाताची माहिती न कळविता आरोपी चालक तेथून पळून गेला होता. ही माहिती मिळताच घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी सुशिला यांना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
Uncategoriz

दिवाळीत साखर स्वस्त होणार

मुंबई – दिवाळीच्या मुहूर्तावर दिवाळ निघत अशी आरडाओरड करणाऱ्या रेशनकार्ड धारकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. साखर आणि डाळीच्या दरात घट करण्यात आली असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांवरील व्याजदरात वाढ

दिल्ली – केंद्र सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांवरील व्याजदरात ०.४ टक्के इतकी वाढ केली आहे. यामुळे व्याजदर...
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१६-१०-२०१८)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ई नवाकाळ’चे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस – रविंद्र वायकर यांच्यात संघर्ष पेटला

मुंबई –  आरे येथे असलेल्या आदिवासी पाड्यातील जवळपास २ हजार आदीवासींसाठी एसआरएची घरे उपलब्ध करून देत ही घरे किमान ४८० चौरस फुटाचे देण्याची घोषणा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

सलमान ‘भाई’ आणि ‘राणी’ दीपिकाचीच बॉलीवुडवर सत्ता

नवी दिल्ली – स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अहवालानुसार, सप्टेंबर 2017 ते सप्टेंबर 2018 या वर्षात डिजीटल न्यूज चार्टवर सर्वाधिक जास्त सलमान ‘भाई’ आणि ‘राणी पद्मावती’...
Read More