शिवजयंती निमित्त मंगळवारी किल्ले शिवनेरीवर विविध कार्यक्रम – eNavakal
महाराष्ट्र

शिवजयंती निमित्त मंगळवारी किल्ले शिवनेरीवर विविध कार्यक्रम

जुन्नर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 389 व्या जयंतीनिमित्त मंगळवार 19 फेब्रुवारी रोजी शिवनेरी किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिवजन्माचा मुख्य सोहळा सकाळी 9 वाजता होणार असून, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. सकाळी 6 वाजता विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते शिवाई देवीची शासकीय महापूजा होणार आहे. यानंतर पालखी मिरवणूक, सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मंत्रीगणांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थळील वास्तूमध्ये पारंपरिक पाळणा सोहळा, त्यानंतर 10 वाजता मान्यवर शिवकुंज इमारतीमधील बाळ शिवाजी आणि जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. यानंतर मुख्यमंत्री शिवभक्तांना संबोधित करणार, यावेळी आदिवासी समाज प्रबोधिनीचे तळेश्वर पारंपरिक लोककला पथक कला सादर करणार आहेत. शिवनेरी किल्यावरील कार्यक्रमानंतर जाहीर सभा ओझर येथे होणार असून, यानिमित्ताने जुन्नर तालुक्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा समाजाच्या आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

करण जोहर ठरला सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चित्रपट निर्माता

मुंबई – चित्रपट निर्माता करण जोहर बॉलिवूडच्या लोकप्रिय चित्रपट निर्मात्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाने गेल्या सहा महिन्यातील बॉलिवूडच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट निर्मात्यांची नुकतीच एक...
Read More