शिवछत्रपती पुरस्कार निर्णयात हस्तक्षेप करणार नाही – उच्च न्यायालय – eNavakal
क्रीडा न्यायालय मुंबई

शिवछत्रपती पुरस्कार निर्णयात हस्तक्षेप करणार नाही – उच्च न्यायालय

मुंबई – राज्याचा सर्वांत प्रतिष्ठेचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार वादामध्ये अडकला आहे. आर्टिस्टीक जिमनॅस्ट अक्षता वावेकर हिने या पुरस्कारासाठी आपल्या नावाची निवड न झाल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत ‘या पुरस्काराची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने झालेली असल्याने यामध्ये कोणताही गैरप्रकार झाल्याची शक्यता नाही’, असे म्हणून या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. तसेच ‘संघटनांमधील वादाने खेळाडूंचे नुकसान होत असेल, तर त्यांनी संघटनांकडे दाद मागावी’, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, शिवछत्रपती पुरस्कार अंतिम निवड समितीमध्ये पद्मश्री पुरस्कार विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते, महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशनचे सदस्य व पॅराआॅलिम्पिक असोसिएशनचे सदस्य यांचा समावेश होता.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ भारत दौऱ्यावर! पंतप्रधानांची घेतली भेट

नवी दिल्ली – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ हे तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून भिवंडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडी – ३० वर्ष जुन्या इमारतीचा प्लास्टरचा भाग कोसळून कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीच्या पद्मानगर भागात घडली आहे. गंगाजमुना या दुमजली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

गोव्यात मुसळधार पाऊस! जनतेला दिलासा

पणजी – गोव्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येथे गेल्या आठवड्यात ७० टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याने पावसाच्या प्रतीक्षात असलेली जनता पावसाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

टायगर-दिशाचा ब्रेकअप! चाहत्यांमध्ये नाराजी

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांनी आपल्या प्रेमाची कबुली कधीच उघडपणे दिली नाही. मात्र कधीच उघडपणे आपल्या रिलेशनशिपला नकारही दिला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी त्रालमध्ये चकमक

त्राल – जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात जंगलात ही चकमक सुरू असून दोन ते...
Read More