शिर्डीत साईबाबांची प्रतिमा भिंतीवर उमटल्याचा भक्तांचा दावा – eNavakal
महाराष्ट्र

शिर्डीत साईबाबांची प्रतिमा भिंतीवर उमटल्याचा भक्तांचा दावा

शिर्डी – आज आषाढी एकादशीनिमित्त साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गुरुवारपासूनच भाविकांनी शिर्डीत मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. यावेळी शिर्डीत द्वारकामाईत पुन्हा साईबाबांचा चेहरा दिसू लागल्याचे भाविकांनी म्हटले आहे. त्यामुळे साईंची प्रतिमा बघण्यासाठी याठिकाणी ग्रामस्थांसह हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

गुरुवारी नेहमीप्रमाणे आरती संपल्यावर साडेअकराच्या सुमारास द्वारकामाईत भिंतीवर साईबाबांचा चेहरा दिसला, असे काही भाविकांनी म्हटले. ही बातमी पसरताच ग्रामस्थांनी आणि भाविकांनी द्वारकामाईत धाव घेतली. यावेळी साईबाबा संस्थानचे सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांनी गर्दीवर नियंत्रण आणले.

दरम्यान, यापूर्वी ६ जानेवारी २०१२ आणि १२ एप्रिल २०१८ रोजीही साईबाबांचा चेहरा दिसल्याचे भाविकांकडून सांगण्यात आले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

भारताच्या अभिजीत बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

नवी दिल्ली – भारतीय शास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. गरिबी हटाव या योजनेसाठी प्रयत्न करणार्‍या अभिजीत बॅनर्जीं यांना...
Read More
post-image
News महाराष्ट्र

कांदा, टोमॅटोपाठोपाठ आता लिंबू महागले

कोल्हापूर – कांदा, लसूण आणि टोमॅटोपाठोपाठ आता लिंबूही महागला आहे. ऑक्टोबर हिट आणि निवडणूक प्रचाराचा काळ यामुळे लिंबाचा प्रतिनग दर पाच रुपये झाला आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More
post-image
News देश

सोशल मीडियावरील अकाउंटना आधार लिंक करणे गरजेचे नाही

नवी दिल्ली- बॅँकेपासून ते मॅट्रिमोनियल साईट्सपयर्र्ंत सर्वत्र आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटनाही आधार लिंक करावे या मागणीसाठी दाखल झालेली...
Read More