शाहिर दत्ताजी वाघ काळाच्या पडद्याआड – eNavakal
अन्य महाराष्ट्र

शाहिर दत्ताजी वाघ काळाच्या पडद्याआड

नाशिक – प्रसिध्द लोककलावंत, आंबेडकरी जलसाकार, शाहीर दत्ताजी श्रीपतराव वाघ यांचे आज डांगरउतारा येथील राहत्या घरी निधन झाले. ते ६२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून असा परिवार आहे. पंचवटी येथील अमरधाममध्ये दत्ता वाघ यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शाहीर दत्ता वाघ हे कसलेले कलावंत होते त्यांचा आवाज खणखणीत होता. गाण्याची प्रचंड आवड असल्याने ते आंबेडकरी जलशातून गाणी म्हणत. विशेषत: बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी म्हणण्यात त्यांना विशेष रस होता. वामनदादा कर्डक, अण्णा भाऊ साठे यांची गाणी ते आवर्जुन म्हणत. शाहिरीतून समाजप्रबोधन करतानाच शिवसेनेतही ते सक्रिय होते. १९६८ मध्ये काकासाहेब सोलापूरकर यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

वाघ हे अनेक वर्षे अखिल भारतीय मराठी शाहिरी परिषदेचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष होते. तसेच मानधन निवड समितीचेही अध्यक्ष होते. कलावंतांचा मानधनाचा प्रश्न सो़डवतानाच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या अनेक कलावंतांचा निवृत्तीवेतनाचा प्रश्नही त्यांनी सोडवला होता. महापालिकेची नोकरी सोडल्यानंतर त्यांनी ‘शाहीर दत्ता वाघ आणि पार्टी’ या नावाने कलापथक काढले होते. ‘गावरान ठेवा’ नावानेही त्यांचा एक कार्यक्रम चालत असे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. गेल्याच वर्षी त्यांना ऑगस्ट २०१७ मध्ये वामनदादा कर्डक जयंती निमित्त ‘कलाभूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

जनशताब्दीला सावंतवाडीत थांबा

सावंतवाडी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईहून गोव्याला जाणार्‍या जनशताब्दी एक्स्प्रेसला आता सावंतवाडी स्थानकात थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाकडून...
Read More
post-image
News देश

‘पारले’ बिस्कीटला मंदीचा फटका! हजारो कर्मचार्‍यांवर बेकारीचे संकट

नवी दिल्ली – बिस्कीटांचे उत्पादन घेणार्‍या देशातील सर्वात मोठ्या पारले कंपनीलाही मंदीचा फटका बसला आहे. तसेच मागणी घटल्याने कंपनीने उत्पादनात कपात केली आहे. त्यामुळे...
Read More
post-image
News देश

प्रियांका चोप्राला यूएनच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरून हटवा

नवी दिल्ली- पाकिस्तानी मंत्र्याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानातील मानवी हक्क खात्याच्या मंत्री शिरीन मझारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! १६ तासांपासून फरार

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लॉंडरिंग प्रकरणात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृह व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा...
Read More