शास्ती माफीमध्ये पंचाहत्तर टक्के सवलत – महापौर व आयुक्तांची घोषणा – eNavakal
अन्य महाराष्ट्र

शास्ती माफीमध्ये पंचाहत्तर टक्के सवलत – महापौर व आयुक्तांची घोषणा

नगर – मालमत्ता करातील १००% शास्ती माफीची मागणी असताना मनपाने संपूर्ण मागणी मान्य न करता शास्ती सवलत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे शंभर टक्के शास्तीमाफीमुळे मनपाचे नुकसान होईल असे स्पष्टीकरण आयुक्त घनश्याम मंगळे यांनी दिले दरम्यान मालमत्ता करावरील शास्ती ११ मे पर्यंत 7५% व १२ मे पासून ११ जून पर्यंत ५०% शास्ती माफी सवलत देण्याची घोषणा महापौर सुरेखा कदम व आयुक्त घनशाम मंगळे यांनी आज पत्रकार परिषदेत केली या कालावधीत चांगला प्रतिसाद मिळाल्यास आणखी दोन महिन्यांच्या कालावधीची वाढ यात करण्यात येणार असल्याचे ते पुढे म्हणाले. महापौर कदम म्हणाले, शास्ती माफी संदर्भात अनेक वेळा आयुक्तांशी चर्चा केली होती मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे निर्णय घेण्यात आला नव्हता त्यामुळे शास्तीचा निर्णय आता घेण्यात आलाय. तसेच शास्ती सवलतीचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आयुक्तांकडून सांगण्यात आले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र मुंबई

मॉल पार्किंग मोफत देण्याचा कायदा आहे का? मुंबई हायकोर्टाचा पुणे पालिकेला सवाल

मुंबई – पुणेकरांना मॉलमध्ये पार्किंग शुल्क फ्री करण्याबाबत पालिकेचा कायदा आहे का? असा सवाल उच्च न्यायालयाने आज उपस्थित केला. पार्किंगचे शुल्क वसूल करण्यास मनाई...
Read More
post-image
News मुंबई

वर्सोवा ते लोखंडवाला रस्त्याच्या बांधकामात कांदळवनांचा बळी

मुंबई – मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वर्सोवा ते लोखंडवाला लिंक रोड एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात येणार आहे. परंतु या मार्गासाठी कांदळवनांचा बळी जाणार असल्याचा...
Read More
post-image
News मुंबई

पालिका प्रसूतीगृहांमध्ये बसवणार सीसीटिव्ही कॅमेरे

मुंबई – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेने आपल्या रुग्णालय व प्रसूतीगृहांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयातून नवजात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईत सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकाचा मान ‘मुंबई सेंट्रल’ला मिळाला

मुंबई – मुंबई शहरातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक म्हणून ‘मुंबई सेंट्रल’चे नाव समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यवरणपूरकतेच्या तब्बल 12 कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुरामुळे साखर महाग झाली दुसर्‍यांदा दरवाढ! 40 रुपये किलो

कोल्हापूर – पूरस्थिती पूर्णपणे निवळत चालली असली तरी या कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचा फटका साखरेला बसला आहे. साखरेचे भाव दुसर्‍यांदा वाढले आहेत. मागील आठवड्यात...
Read More