शासनादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी दिव्यांगाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा – eNavakal
News आंदोलन महाराष्ट्र

शासनादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी दिव्यांगाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अलिबाग- महाराष्ट्र शासनाने दिव्यांग व्यक्तींसाठी वेळोवेळी काढण्यात आलेले शासन निर्णय हे केवळ कागदावरच राहिले. परंतु दिव्यांग हक्क कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झालेली नाही. या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन कोकण विभाग यांच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला.
जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या स्थानिक निधीतील राखीव निधीची रक्कम ही अपंगांसाठी खर्च करावी, अपंगांना स्वयंरोजगारासाठी दोनशे चौरस फुटाची जागा मिळावी, दिव्यांगासाठी राखीव असलेल्या पाच टक्के निधी योग्य मार्गाने दिव्यांग हितासाठी शंभर टक्के खर्च करण्यात यावा,दिव्यांगासाठी घरकुल योजना, गृहनिर्माण योजनाची मागणी,जिल्ह्यातील संबंधित सर्व कंपन्यांमध्ये दिव्यांग व्यक्तींना शक्य असेल तिथे कामास रुजू करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे.असा पध्दतीचे आदेश सर्व कंपनीला देण्यात यावे.दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यासंदर्भात बँकेना सूचना देण्यात याव्यात, अशा पद्धतीची एक खिडकी योजना राबविण्यात यावी, दिव्यांग व्यक्तींनी स्थापन केलेल्या औद्योगिक सहकारी संस्थांना शासनातर्फे भूखंड देण्यात यावे. काही दिव्यांग आधारकार्डपासून वंचित असल्याने त्यांना संजय गांधी निराधार योजनासारख्या योजनांचा लाभ घेता येत नाही म्हणून त्यांना अपंग प्रमाणपत्र, शिधापत्रिका द्वारे त्यांना लाभ देण्यात यावा, आदी मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चातील अपंग व्यक्तींनी तेथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलीस प्रशासनास न जुमानता जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावर ठिय्या मांडून आंदोलन केले आणि शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र मुंबई

मॉल पार्किंग मोफत देण्याचा कायदा आहे का? मुंबई हायकोर्टाचा पुणे पालिकेला सवाल

मुंबई – पुणेकरांना मॉलमध्ये पार्किंग शुल्क फ्री करण्याबाबत पालिकेचा कायदा आहे का? असा सवाल उच्च न्यायालयाने आज उपस्थित केला. पार्किंगचे शुल्क वसूल करण्यास मनाई...
Read More
post-image
News मुंबई

वर्सोवा ते लोखंडवाला रस्त्याच्या बांधकामात कांदळवनांचा बळी

मुंबई – मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वर्सोवा ते लोखंडवाला लिंक रोड एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात येणार आहे. परंतु या मार्गासाठी कांदळवनांचा बळी जाणार असल्याचा...
Read More
post-image
News मुंबई

पालिका प्रसूतीगृहांमध्ये बसवणार सीसीटिव्ही कॅमेरे

मुंबई – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेने आपल्या रुग्णालय व प्रसूतीगृहांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयातून नवजात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईत सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकाचा मान ‘मुंबई सेंट्रल’ला मिळाला

मुंबई – मुंबई शहरातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक म्हणून ‘मुंबई सेंट्रल’चे नाव समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यवरणपूरकतेच्या तब्बल 12 कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुरामुळे साखर महाग झाली दुसर्‍यांदा दरवाढ! 40 रुपये किलो

कोल्हापूर – पूरस्थिती पूर्णपणे निवळत चालली असली तरी या कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचा फटका साखरेला बसला आहे. साखरेचे भाव दुसर्‍यांदा वाढले आहेत. मागील आठवड्यात...
Read More