शाळेकडून फी भरण्याचा तगाद्याला कंटाळून विद्यार्थ्यांची आत्महत्या – eNavakal
महाराष्ट्र

शाळेकडून फी भरण्याचा तगाद्याला कंटाळून विद्यार्थ्यांची आत्महत्या

वसई –   शाळा मुख्याध्यापकाने फी भरण्याचा तगादा लावल्याच्या कारणांवरून आठवीतील विद्यार्थ्याने स्वतःच्या घरातच गळफास घेतल्याची दुर्देवी घटना सोमवारी उशिरा वालिव मध्ये घडली आहे. अजय दुबे वय 14 असे या शाळकरी विद्यार्थ्यांचे नाव असून तो वालिव भागातील एका शाळेत इयत्ता आठवीत शिकत होता.

या प्रकरणी मयत मुलाच्या वडिलांच्या फिर्यादिवरून शाळा व संबंधित मुख्याध्यापकांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा वालिव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली, अधिक माहितीनुसार अजय दुबे हा आठवीत शिकत होता, अभ्यासात हुशार असलेल्या अजयचे वडील रिक्षा चालक आणि त्यात घराची परिस्थिती बिकट असल्याने शाळेची फी अनेकदा भरणा करावयाची राहून जायची,

दरम्यान फी न भरल्याने शाळा व संबंधित मुख्याधापक अजयला फी भरण्याचे फर्मान सोडायचे प्रसंगी उन्हात उभे करणे, कोंबडा बनवणे आणि फी भरा अन्यथा परीक्षेस बसून दिले जाणार नाही असे हि शाळेकडून वारंवार सांगितले जायचे.परिणामी कंटाळून अजयने सोमवारी रात्री घरातच गळफास लावून आपले जीवन संपवून टाकले मात्र . अजय ने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती घटनास्थळी ही चिठ्ठी समोर सापडून आल्याने ह्या आत्महत्येचे नेमके आणि मूळ कारण उघडकीस आले.,

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आरोग्य देश

बिहारमध्ये मेंदूज्वरामुळे १३२ जणांचा बळी

पाटणा – बिहारमध्ये मेंदूज्वर तापाचा कहर अद्यापही सुरुच असून यामुळे मृतांची संख्या १३२ वर पोहोचली आहे. तसेच इतर रुग्णालयांमध्ये उपचारांविना मृत्यू झालेल्या मुलांची आकडेवारीही अद्याप...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाणीप्रश्नावरून विधानसभेत गदारोळ! १५ मिनिटे तहकूब

मुंबई – अधिवेशनाचा चौथ्या दिवशी आज विधानसभेत पाणीप्रश्नावरून प्रचंड गदारोळ झाला असून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई हवामान

दक्षिण कोकणात मान्सूनचे आगमन

मुंबई – राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी जनता मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होती. त्यामुळे जनतेला आता दिलासा मिळाला आहे. कारण मान्सून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : शिव VS पराग आणि नेहा

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या एक डाव धोबीपछाड या साप्ताहिक कार्यात बरीच भांडणंं, वाद विवाद, आरोप–प्रत्यारोप सुरू आहेत. या टास्कमध्ये जिंकण्यासाठी बिग बॉस...
Read More
post-image
देश

लखनऊत वर्‍हाडाची गाडी कोसळली! २२ जणांना वाचवले, ७ मुले बेपत्ता

लखनऊ – उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये आज सकाळी लग्नातून परतणाऱ्या वर्‍हाडाच्या गाडीला भीषण अपघात झाला. ही गाडी इंदिरा कालव्‍यात कोसळली. या गाडीत एकूण २९ वर्‍हाडी होते. त्यापैकी...
Read More