शालेय विद्यार्थ्यांना मोंदीची पुस्तके – eNavakal
मुंबई शिक्षण

शालेय विद्यार्थ्यांना मोंदीची पुस्तके

मुंबई – राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीयस्तरावरील नेत्यांच्या कार्याची आणि विचारांची ओळख व्हावी या उद्देशाने महात्मा फुले, महात्मा गांधी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके खरेदी करून त्याचे विद्यार्थ्यांमध्ये वाटप केले जाते. मात्र, यावर्षी या राष्ट्रीय महापुरूषांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती मोदी भक्ती निर्माण व्हावी यासाठी 60 लाख रूपये खर्च करून गुजराती, मराठी भाषेतील मोदींची चरित्र पुस्तके खरेदी करून त्याचे वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने घेतला आहे.
विविध शाळांमध्ये पहिली ते 5 वी पर्यंत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना महापुरूषांच्या कार्याची ओळख व्हावी यासाठी महात्मा फुले, महात्मा गांधी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांची दरवर्षी चरित्र पुस्तके खरेदी केली जातात. तसेच ही पुस्तके त्या त्या शाळांच्या ग्रंथलयात पाठविली जातात. मात्र यंदाच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील चरित्र पुस्तकांची खरेदी शिक्षण विभागाकडून करण्यात येणार असून या राष्ट्रीय महापुरूषांपेक्षा सर्वाधिक पुस्तके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील एका अधिकार्‍याने दिली.
फुले, गांधी, डॉ. आंबेडकर पुस्तकापेक्षा पंतप्रधान मोदी आणि चाचा चौधरी यांची 72 हजार 933 गुजराती भाषेतील पुस्तके मागविण्यात येणार आहेत. तर हिंदी आणि इंग्रजी भाषेतील 7 हजार 148 प्रती मागविण्यात येणार असून त्यासाठी 59 लाख 42 हजार रूपयांचा खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील मराठी भाषेतील 69 हजार 416 पुस्तकांची 45 रूपये या दराने पुस्तकांची खरेदी करण्यात येणार आहे. याशिवाय 72 हजार पुस्तके माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरील पुस्तकांचीही याच दराने खरेदी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस फक्त नागपूरचाच विकास करतात

परभणी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज जिल्ह्यात दौर्‍यात आहेत. आपल्या खास शैलीत पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि भाजप नेत्यावर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

महिला स्पेशल लोकलसाठी बदलापुरात सेनेची स्वाक्षरी मोहीम

बदलापूर – बदलापूर येथून छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी गर्दीच्या वेळी महिला स्पेशल लोकल सोडण्याच्या मागणीसाठी बदलापूर येथे शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आज...
Read More
post-image
क्रीडा देश

भारतीय खेळाडूंना पत्नी, प्रेयसीपासून दूर राहण्याचे आदेश

लंडन – टी-20 आणि वन डे मालिका संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना संघ व्यवस्थापनाने एक महत्वाचा आदेश दिला आहे. इंग्लंडविरूद्धचे पहिले तीन सामने होईपर्यंत भारतीय खेळाडूंना...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : उंचे लोग उंची पसंद

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी संपर्क अभियान सुरू केले आहे. म्हणजे समाजातल्या मोठ्याकिंवा प्रतिष्ठित लोकांच्या भेटीगाठी घेण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. प्रत्येक राज्यात जाऊन...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेडात चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमध्ये 4 लाखांची लूट

नांदेड – आज पहाटे 4.50 वाजता चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमधून चोरट्यांनी 4 लाख 24 हजारांचा ऐवज असलेली एक बॅग चोरून नेली आहे. चैन्नई ते नगरसोल जाणारी...
Read More