शापोलोव्हचा थॉमस बर्डिचवर सनसनाटी विजय – eNavakal
क्रीडा विदेश

शापोलोव्हचा थॉमस बर्डिचवर सनसनाटी विजय

रोम – इटालियन खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत कॅनडाचा युचा खेळाडू डेनिस शापोलोव्हने पहिल्या फेरीच्या सामन्यात 15 वे मानांकन देण्यात आलेल्या बल्गेरियाच्या थॉमस बर्डिचचा तीन सेटमध्ये पराभव करून स्पर्धेत खळबळ माजवली. डेनिसने ही लढत 1-6, 6-3, 7-6 अशी जिंकली. पहिला सेट गमावूनदेखील डेनिसने पुढचे दोन सेट जिंकून या लढतीत बाजी मारली. गेल्याच आठवड्यात झालेल्या माद्रिद आंतरराष्ट्रीय टेनिस

स्पर्धेत शापोलोव्हने उपांत्य फेरीत मजल मारली होती. त्या स्पर्धेत त्याने आपलाच सहकारी मिलॉस रॉनिकचा पराभव केला होता. आता या दोन शानदार विजयानंतर जागतिक क्रमवारीत त्याच्या कामगिरीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.
इतर सामन्यात डेव्हिड गॉफिनने इटालीच्या मार्कोचादेखील तीन सेटमध्ये पराभव केला. तर 14 वे मानांकन देण्यात आलेल्या डिगोने चिलीच्या निकोलसला सरळ दोन सेटमध्ये नमविले. आणखी एका सामन्यात लुकास कोलीने आंद्रे सेफीला तीन सेटमध्ये पराभूत केले. काही दिवसांपूर्वीच्या झालेल्या बार्सिलोना स्पर्धेची अंतिम फेरी गाठणार्‍या स्टेफनोनेदेखील
स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. त्याचा प्रतिस्पर्धी कोरिकने दुखापतीमुळे पहिल्या सेटनंतर माघार घेतली.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
क्रीडा विदेश

फुटबॉल विश्वातील सर्वात श्रीमंत क्लब ठरला मॅचेस्टर युनायटेड

पॅरिस – फुटबॉल विश्वातील सर्वात श्रीमंत क्लब ठरला आहे तो इंग्लंड मधील नामंवत ‘मॅचेस्टर युनायटेड क्लब’ इंग्लिश प्रिमियर फुटबॉल स्पर्धेत त्याने दुसरा क्रमांक पटकावला....
Read More
post-image
क्रीडा मुंबई

डु प्लेसिसची खेळी सर्वोत्तम खेळी होती – धोनी

मुंबई – हैदराबादविरुद्धच्या ‘प्ले ऑफ’मधील पहिल्या लढतीत चेन्नईने हैदराबादवर विजय मिळवून स्पर्धेची प्रथम अंतिम फेरी गाठण्याचा मान मिळवला. त्यांच्या या विजयात सलामीला आलेल्या डु...
Read More
post-image
क्रीडा देश

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत रैना होणार सर्वाधिक धावांचा मानकरी

नवी दिल्ली – यंदाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेनंतर चेन्नई संघाचा डावखूरा फटकेबाज फलंदाज सुरेश रैना सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरणार आहे. हैदबादविरुद्धच्या लढतीत त्यांनी 22...
Read More
post-image
क्रीडा

कोलकाताने केले राजस्थानचे आयपीएलमधून ‘पॅक अप’

कोलकाता – दिनेश कार्तिकच्या कोलकाता संघाने अजिंक्य राहणेच्या राजस्थान संघाचे आज आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतून ‘पॅक अप’ केले. आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या एलीमिनेटरच्या लढतीत...
Read More
post-image
क्रीडा विदेश

‘अ‍ॅशेस’ मालिकेतील अपयश पुसून काढण्याची इंग्लंडला संधी

लंडन – नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियातील ‘अ‍ॅशेस’ मालिकेतील आणि न्यूझीलंडमधील कसोटी मालिकेतील अपयश पुसून काढण्याची संधी यजमान इंग्लंड संघाला उद्यापासून येथे पाकिस्तानविरुद्ध सुरू होत असलेल्या 2...
Read More