शहरातील स्वच्छता मोहीम आणि वाहतुकीला अडसर ठरणारा तीनबत्तीचा ’मंगल बाजार’ बंद – eNavakal
News महाराष्ट्र

शहरातील स्वच्छता मोहीम आणि वाहतुकीला अडसर ठरणारा तीनबत्तीचा ’मंगल बाजार’ बंद

भिवंडी- भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका प्रशासनामार्फत स्वच्छ भारत अभियान मोहिम जोरात सुरू आहे. पालिका आयुक्त मनोहर हिरे ,अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब तसेच पालिकेचे पाच प्रभाग अधिकारी स्वच्छता मोहिमेत विशेष लक्ष देवून शहरातील साफसफाई पार पाडली जात आहे.मात्र शहरातील तीनबत्ती येथील दर आठवड्याला भरणारा मंगल बाजार हा शहर स्वच्छतेला व वाहतूक कोंडीला मारक ठरत असल्याने 2 ऑक्टोबरपासून पालिका प्रशासनाने सदरचा हा आठवडी बाजार बंद केला आहे.

या भरणार्‍या आठवडा बाजारात विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी सुमारे 350 विक्रेते कल्याण ,मुब्रा ,ठाणे ,मुंबई आदी परिसरातून भिवंडीत दाखल होत होते. मात्र या विक्रेत्यांकडून पालिकेला फक्त 10 हजार रुपये उत्पन्न मिळत होते. तर बाजार परिसरात पडलेली घाण उचलण्यासाठी पालिकेला सुमारे 1 लाख रुपये खर्च येत होता. त्यातच मुख्य बाजार पेठ परिसरात आठवडा बाजार भरत असलयाने दिवसभर वाहतूक कोंडी होत होती. त्याचा परिणाम शहराच्या विविध भागात जाणवत होता. ही बाब प्रभाग समिती क्र. 5 चे सहाय्यक आयुक्त सोमनाथ सोष्टे यांनी पालिका आयुक्त मनोहर हिरे यांच्या निदर्शनास आणून दिल्याने त्यांनी त्रासदायक ठरणारा आठवडी मंगलबाजार तत्काळ बंद करण्याचे निर्देश दिले.त्यानूसार बिट निरीक्षक साकिब खर्बे, संतोष भोई, हेमंत भगत, रोहितकडू, जगन ठाकरे, इब्राहिम शेख, अनिल सकपाळ आदी कर्मचार्‍यांनी काल रात्रीपासूनच दक्षता घेऊन मंगळवारी सकाळी भरणारा आठवडी बाजार भरण्यास प्रतिबंध केला आहे. यावेळी अग्निशमन दल व पोलीस कर्मचारी दिवसभर मंगलबाजार या ठिकाणी तैनात केले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

दहीहंडी निमित्त आज शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई- दहीहंडी उत्सव असल्याने उद्या शनिवारी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून उद्या...
Read More
post-image
News देश

राहुल गांधी आज काश्मिरला जाणार

नवी दिल्ली- कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे विरोधी पक्षाच्या 9 नेत्यांसोबत आज  काश्मिरच्या दौर्‍यावर जाणार आहेत. जम्मू-काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांचा...
Read More
post-image
News मुंबई

विमानतळ धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश करणार्‍या तरुणाला अटक

मुंबई – विमानतळाच्या धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी एका 24 वर्षांच्या तरुणाला काल विमानतळ पोलिसांनी अटक केली. कामरान अब्दुल हलीम शेख असे या आरोपी तरुणाचे...
Read More
post-image
News मुंबई

मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर रविवार 25 ऑगस्टला मेगाब्लॉक

मुंबई- मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रविवार 25 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.20...
Read More
post-image
News महाराष्ट्र

आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार

मुंबई – राज्यात आगामी विधानसभा निवडणूकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असताना आता ‘आम आदमी पक्षाने’ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केली आहे. ‘आप’चे राष्ट्रीय...
Read More