शरद पवार यांनी विमानात साजरा केला बर्थडे… – eNavakal
News मुंबई

शरद पवार यांनी विमानात साजरा केला बर्थडे…

मुंबई  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा 12 डिसेंबरला 77 वा वाढदिवस होता. पवारांनी आपला वाढदिवस साजरा न करता शेतकर्‍यांच्या प्रश्नावर नागपूरात सरकारवर हल्लाबोल केला. नागपुरात निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्त्व खुद्द शरद पवार यांनी केले. कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हट्टामुळे पवारांनी विमान प्रवासात केक कापून अत्यंत साध्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला.

भाजप सरकारविराेधात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संयुक्त जनआक्रोश-हल्लाबोल मोर्चाची मंगळवारी दुपारी 5 वाजता सांगता झाली. शरद पवार व्यासपीठावरून खाली उतरले. व्यासपीठाच्या शेजारी अनिल देशमुख यांची पवारांना जाण्यासाठी आॅडी गाडी लावली होती. पवार सुरक्षा रक्षकाच्या गराड्यात लगबगीत गाडीत बसू लागले, दरम्यान वाढदिवसानिमित्त पवारांना गुलाबफूल देण्यासाठी नेत्यांची चढाओढ लागली. पण पवारांनी एकाचाही गुलाब स्वीकारला नाही, ते थेट गाडीत बसून निघून गेले, त्यामुळे नेत्यांच्या हातातील ताटकळलेले गुलाब अखेर त्यांच्याच हातात राहिले. शरद पवार आपल्या वाढदिवसाला मोठा डामडौल करत नाहीत. पूर्वी ते वाढदिवसाला पुण्यातील बारामती हाॅस्टेलवर कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा स्वीकार करत. मंगळवारी जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा आणि पवार यांचा 77 वा वाढदिवस नेमका एकाच दिवशी आला होता. त्यामुळे पवार यांनी वाढदिवसाचा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम ठेवला नव्हता. त्यातच त्यांची तब्येतही ठीक नव्हती. मंगळवारी सकाळीच ते रुग्णालयातून बाहेर पडले होते. सोमवारी त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ‘राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बाबांच्या वाढदिवसाला कोणताही कार्यक्रम ठेवू नये’, अशा सूचना त्यांची कन्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्या होत्या. त्यामुळे पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात एकही बॅनर, फ्लेक्स दिसले नाहीत. नाही म्हणायला व्यासपीठावर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या हस्ते एक गुच्छ देवून पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तो सुद्धा पवार यांनी नाखुषीनेच स्वीकारला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

जनशताब्दीला सावंतवाडीत थांबा

सावंतवाडी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईहून गोव्याला जाणार्‍या जनशताब्दी एक्स्प्रेसला आता सावंतवाडी स्थानकात थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाकडून...
Read More
post-image
News देश

‘पारले’ बिस्कीटला मंदीचा फटका! हजारो कर्मचार्‍यांवर बेकारीचे संकट

नवी दिल्ली – बिस्कीटांचे उत्पादन घेणार्‍या देशातील सर्वात मोठ्या पारले कंपनीलाही मंदीचा फटका बसला आहे. तसेच मागणी घटल्याने कंपनीने उत्पादनात कपात केली आहे. त्यामुळे...
Read More
post-image
News देश

प्रियांका चोप्राला यूएनच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरून हटवा

नवी दिल्ली- पाकिस्तानी मंत्र्याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानातील मानवी हक्क खात्याच्या मंत्री शिरीन मझारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! १६ तासांपासून फरार

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लॉंडरिंग प्रकरणात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृह व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा...
Read More