मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर जाणार होते. मात्र हा दौरा रद्द झाला असून ते १४ आणि १५ ऑगस्ट रोजी सांगली-कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील पूरग्रस्तांची भेट घेणार असून तेथे सुरु असलेल्या मदत कार्याची पाहणी करणार आहेत. तसेच शरद पवार शिरोळ येथे पूरग्रस्तांसोबत स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहेत.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील महापुराचे पाणी ओसरत असले तरी लोकांचे घरदार वाहून गेल्याने त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अतिशय बिकट झाला आहे. राज्यभरातून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत.