शरद पवार आणि उद्धव ठाकरेेंची एकांतात खातेवाटपाबाबत चर्चा – eNavakal
News मुंबई

शरद पवार आणि उद्धव ठाकरेेंची एकांतात खातेवाटपाबाबत चर्चा

मुंबई – आज दिल्लीतून आलेल्या शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वरळीच्या नेहरु सेेंटरमध्ये एकांतात बैठक झाली. खुप दिवस रखडलेल्या सहा मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत फक्त दोघांमध्येच चर्चा झाली. उद्या किंवा परवा सहा मंत्र्यांना खातेवाटप जाहीर केले जाईल. त्याचप्रमाणे येत्या सोमवारी, 9 डिसेेंबरला राजभवनावर छोटासा मंत्रिमंडळ विस्तार होण्याचीही शक्यता आहे. आजच्या बैठकीत सीमाप्रश्‍नावर सुप्रीम कोर्टात राज्य सरकारने काय भूमिका मांडावी याबाबतही चर्चा झाली. याच सीमाप्रश्‍नाबाबत उद्या शरद पवार आणि मुख्यमंत्री यांची पुन्हा बैठक होणार आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न हा शिवसेनेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
आज संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाही दुपारी चार वाजताच शरद पवार मुंबईत आले. तेथून ते तडक नेहरु सेेंटरला गेले. 6 डिसेेंबरचे आपले कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही नेहरु सेेंटरला पोहोचले. दोघांमध्ये दोन तास चर्चा झाली. आता मंत्रिमंडळ विस्तार केला तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये व आमदारांमध्ये भांडणे होतील, अशी भीती शरद पवारांना आहे. मात्र शपथ घेतलेल्या नवनिर्वाचित सहा मंत्र्यांचे खातेवाटप उरकून घ्यावे यावर मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची सहमती झाली आहे. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनापूर्वीच व्हावा ही कॉँग्रेसची मागणी आहे.
काल कॉँग्रेस नेत्यांची आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत कॉँग्रेसने मंत्रिमंडळ विस्तारावर जोर दिला होता. त्यामुळे कॉँग्रेसच्या आग्रहास्तव छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार करावा या निर्णयावर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आल्याचे समजते. मात्र याबाबतचे सर्व धोके आणि अडचणी तपासून घेतल्या जात आहेत. उद्या किंवा परवा शपथ घेतलेल्या शिवसेनेच्या दोन, राष्ट्रवादीच्या दोन आणि कॉँग्रेसच्या दोन मंत्र्यांना खातेवाटप होण्याची शक्यता आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
दहशतवादी हल्ला देश संरक्षण

लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर ठार, दोन हल्लेखोरांचा खात्मा

श्रीनगर – बारामुल्लातील क्रिरी भागात आज सकाळी गस्तीवर असलेल्या सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस पथकावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली. दहशतवाद्यांनी केलेल्या या गोळीबारात...
Read More
post-image
देश

सरकारमुळे क्रिकेटच्या मैदानावरचं वातावरण भयंकर असेल, इम्रान खानची मोदी सरकारवर टीका

कराची – येत्या काळात भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने होणार का याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. त्यावर आज पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ज्यावेळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

राहुल गांधी यांचे वक्तव्य गांभीर्याने घेत नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई – फेसबुक आणि व्हाट्स अँप भाजपच्या नियंत्रणाखाली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...
Read More
post-image
ट्रेंडिंग मनोरंजन

मध्यमवर्गीय कुटुंबातील निशिकांत कामत यांची मराठी, तामिळ, हिंदी सिनेसृष्टीत दमदार कामगिरी

मुंबई – प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. वयाच्या ५० वर्षीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांनी त्यांच्या संपूर्ण हयातीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यातून आज दिलासादायक आकडेवारी, बरे झालेल्या रुग्णांचीही संख्या अधिक

मुंब –  राज्यात आज कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून ११ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८४९३ नवीन रुग्णांचे...
Read More