शरद पवारांची माढ्यातून माघार; संजयमामा शिंदे लढवणार निवडणूक – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

शरद पवारांची माढ्यातून माघार; संजयमामा शिंदे लढवणार निवडणूक

बारामती – माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार निवडणुक लढविणार का याबाबत सस्पेन्स कायम होता. अखेर आज शरद पवार यांनी बारामतीतील गोविंद बाग येथील सभेत राष्ट्रवादीकडून माढा लोकसभा मतदार संघासाठी अकलूजच्या मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली. यावेळी शरद पवार यांनी माझ्यापेक्षाही जास्त मतांनी संजय शिंदे यांना निवडून द्या, असे कार्यकर्त्यांना आवाहन केले. तर संजय मामा शिंदे यांनी मी राष्ट्रवादीपासून कधीच दुरावलेलो नव्हतो. साहेबांच्या प्रेमापोटी राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याचे सांगितले.

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात संजयमामा शिंदे, आ. प्रशांत परिचारक, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, बांधकाम समितीचे सभापती शेटफळचे विजयराज डोंगरे, आदी मोहिते-पाटील विरोधकांनी भाजपाच्या पाठींब्यावर महाआघाडी करून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली होती. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पाठींब्यावर संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणावर पकड बसवली होती. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजयमामा शिंदे यांना मुंबईला बोलावून घेऊन माढा लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून उभे राहण्याचा आग्रह धरला होता. परंतु संजयमामा शिंदे यांनी स्पष्ट नकार देत आपण केवळ करमाळा येथून विधानसभेला इच्छुक असल्याचे सांगितले होते. त्यानंतर रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी गिरीश महाजन यांची भेट घेऊन माढ्यातून भाजपाच्या तिकिटावर लढण्यास इच्छुक असल्याचे सांगून थेट भाजपात प्रवेश केला. मोहिते-पाटील यांच्या भाजपा प्रवेशामुळे जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मोहिते-पाटीलच भाजपात आल्याने विरोधकांची पंचाईत झाली आणि अगोदरपासूनच अजित पवार यांच्या संपर्कात असलेले संजयमामा शिंदे यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करून सर्वांनाच मामा बनविल्याची चर्चा जिल्ह्यात होत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कम झाली आहे. माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे हे संजयमामा यांचे मोठे बंधू आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

गोदावरी नदीत बोट बुडाली; ५ जणांचे मृतदेह सापडले

हैदराबाद – आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात गोदावरी नदीमध्ये पर्यटकांची बोट बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीतून एकूण ६१ जण प्रवास करत होते, अशी माहिती...
Read More
post-image
मनोरंजन

राखी सावंत नवऱ्यासोबत येणार बिग बॉसच्या घरात?

मुंबई – सर्वाधिक वादग्रस्त आणि लोकप्रिय रियालिटी शो असलेल्या हिंदी ‘बिग बॉस’चा तेरावा सीजन लवकरच सुरू होणार आहे. यावेळी घरात कोणकोणते कलाकार असणार याबाबत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More