शरद पवारांची पार्थसाठी सभा! पंतप्रधानांवर जोरदार टीका – eNavakal
News महाराष्ट्र

शरद पवारांची पार्थसाठी सभा! पंतप्रधानांवर जोरदार टीका

चाकण – पुलवामा घटनेनंतर दुसर्‍या दिवशी सर्वपक्षीयांची बैठक झाली. या बैठकीत देशाचा माजी संरक्षण मंत्री म्हणून काय करायला हव असा प्रश्न विचारला गेला. त्यावर देशाच्या लष्कराला संपूर्ण अधिकार देऊन अतिरेकी तळ उद्ध्वस्त करण्याचे आदेश शासनाने द्यावेत असा सल्ला देण्यात आला. त्याला सर्वांनी एकमुखी पाठींबा दिला. मात्र या बैठकीला केंद्र शासनाचे प्रमुख मंत्रीच उपस्थिती नव्हते. आम्ही विचारलं पंतप्रधान कुठे आहेत? तर ते धुळ्याला येऊन राजकीय कार्यक्रमात व्यस्त असल्याचे समजले. पुलवामासारख्या घटनेचाही राजकीय फायदा घेतला जात असल्याची बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी भोसे ( ता. खेड) येथे केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चाकण जवळ भोसे ( ता. खेड) येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना खा. पवार बोलत होते. पुढे बोलताना पवार म्हणाले कि, नोटाबंदीचा निर्णय मोदींनी घेतला. पण बँकेत चलन बदलून घेण्यासाठी ज्या रांगा लागल्या त्यात शंभरपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, शेतीवर परिणाम झाल्याची टीकाही शरद पवार यांनी केली. अभिनंदनला पाकिस्तानने पकडले तेव्हा जिनेव्हा करारा अंतर्गत त्यांना सोडण्यात आले. परत आल्यावर त्यांच्या पत्नीने विशेषतः भाजपाला जवानांच्या शौर्याचा राजकीय फायदा घेऊ नका असे सांगितल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले. शौर्य कोणी दाखवले, त्याग कोणी केला आणि छाती फुगवून कोण दाखवतेय, असे म्हणत पवार यांनी पंतप्रधानांवर थेट हल्लाबोल केला. जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे राजकारण केले जात आहे, अशी टीका त्यांनी केली. या मेळाव्यास माजी उपमुखमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, दिलीप वळसे पाटील, माजी आमदार दिलीप मोहिते, विलास लांडे, मंगलदास बांदल, अमोल कोल्हे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
शौर्य कुणाचे व छाती कोण बडवतो
देशावर कोणी हल्ला केला, तर मतभेद बाजुला ठेवावेत, राजकारण करू नये असे वाटते. मात्र ‘कष्ट कोणी केले, शौर्य कोणी दाखवले व 56 इंचाची छाती कोण बडवतो’ असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी त्यांच्यावर खरमरीत टीका केली. पुलवामातील हल्ला हा 56 इंच छाती असलेल्या पंतप्रधान मोदींचे अपयश असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News देश

अरुणाचल-सिक्कीम विधानसभा निवडणूक! भाजपकडून 18 उमेदवारांची यादी जाहीर

नवी दिल्ली – अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकीतील 18 उमेदवारांची नावे आज भाजपने जाहीर केली. यामध्ये सिक्कीमच्या 12 तर अरुणाचल प्रदेशच्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

औरंगाबादमधील तलावात बुडून एकाचा मृत्यू

औरंगाबाद – तलावात पोहण्यासाठी आलेल्या तीन युवकांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबादमधील कागजीपुरा आज दुपारी घटना घडली. नसीम खान मुबीन...
Read More
post-image
News क्रीडा देश

विश्वचषक स्पर्धेत भारताला चांगला खेळ करावा लागेल-राहुल द्रविड

मुंबई – आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपद मिळवायचे असेल तर भारताला चांगला खेळ करावाच लागेल, असे भारताचा माजी कर्णधार आणि जुनिअर भारतीय संघाचे मुख्य...
Read More
post-image
News मुंबई

रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा

मुंबई- घाटकोपरमध्ये विषारी रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा झाल्याची घटना घडली. या सर्वांना महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. विषारी रासायनिक रंगाचा...
Read More
post-image
News अपघात मुंबई

गोरेगावमध्ये कारच्या धडकेत 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई – गोरेगाव येथे एका कारच्या धडकेने अरहान रमजान खान या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका चार...
Read More