शरद पवारांचं एक आदर्श कुटुंब, पार्थ पवारांविषयीचा प्रश्न एका मिनिटांत सोडवतील-राजेश टोपे – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांचं एक आदर्श कुटुंब, पार्थ पवारांविषयीचा प्रश्न एका मिनिटांत सोडवतील-राजेश टोपे

जालना – ‘पार्थ पवार अपरिपक्व आहेत, त्यांच्या शब्दाला कवडीची किंमत देत नाही, असं शरद पवार यांनी म्हटल्यानंतर राष्ट्रवादीत अंतर्गत वाद असल्याचं बोललं जात आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे पार्थ पवार नाराज असल्याचीही चर्चा आहे. यावर स्पष्टीकरण देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं कुटुंब आदर्श आहे. तसेच शरद पवार, अजित पवार आणि पार्थ पवार एकत्रित बसून हा विषय एका मिनिटात संपवतील, असाही विश्वास व्यक्त केला आहे. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी माध्यमांनी या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करु नये, असं आवाहनही केलं.

राजेश टोपे पुढे म्हणाले, “पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या घरात एकोपाच असतो. माध्यमांनी याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करु नये. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचं घर आदर्श घर आहे. पार्थ पवार माझा मित्र आहे. शरद पवार त्यांना घरात बसून जे काही आहे ते सांगतात. शरद पवार ज्येष्ठत्वाच्या नात्याने अधिकाराने काही बोलले असतील तर तो त्यांच्या घरातील मुद्दा आहे.”

“ते एक आदर्श घर असल्याने हा मुद्दा सुटायला काहीही अडचण येणार नाही. माझ्या दोन पिढ्यांचा पवार कुटुंबाशी संबंध आहे. मी अजित पवार यांना चांगलं ओळखतो, पार्थ पवार माझा मित्र आहे. शरद पवार, अजित पवार आणि पार्थ पवार एकत्र बसून एका मिनिटात हा विषय संपवतील. यात काहीही अडचण नाही,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

यावेळी राजेश टोपे यांनी विरोधकांकडून आघाडी सरकार पडणार असल्याच्या दाव्यावरही उत्तर दिलं. महाविकासआघाडी खूप चांगले चालले आहे. सगळेजण व्यवस्थित काम करत आहेत. हे सरकार 5 वर्षे चालणार आहे. विरोधकांनी केलेल्या दाव्यात काहीच तथ्य नाही, असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं.

“बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे द्या, कारवाई करु”

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारच्या काळात बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रश्न विचारला असता राजेश टोपे म्हणाले, “भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी असा भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे द्यावे, त्यावर नक्कीच कारवाई होईल. तो तसा कायदा आहे.”

“कोरोनाच्या काळात सेवा न देणाऱ्या खासगी रुग्णालयांचे परवाने रद्द करु”

“खासगी दवाखाने जर कुणावर उपचार करत नसतील, त्यांच्यावर तर बॉम्बे नर्सिंग अॅक्टनुसार कारवाई केली जाईल. यानुसार त्या रुग्णालयांचे परवाने रद्द करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. खासगी दवाखान्यांनी सेवा दिलीच पाहिजे,” असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
विदेश

९० दिवसांत टिकटॉकच्या संपत्तीची विक्री करण्याचा डोनाल्ड ट्रम्पचा आदेश

न्यूयॉर्क – काही दिवसांपूर्वी अमेरिकेने सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकवर बंदी घातली होती. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी कंपनी बाईटडान्सला ९० दिवसांत अमेरिकेतील टिकटॉकची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र मुंबई

अभिमानास्पद! कॅप्टन अमोल यादव यांनी बनविले भारतीय बनावटीचे पहिले विमान

मुंबई – आज भारताच्या स्वातंत्र्य दिनी मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलून यावी अशी ऐतिहासिक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप येथे राहणारे कॅप्टन अमोल शिवाजी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांचं एक आदर्श कुटुंब, पार्थ पवारांविषयीचा प्रश्न एका मिनिटांत सोडवतील-राजेश टोपे

जालना – ‘पार्थ पवार अपरिपक्व आहेत, त्यांच्या शब्दाला कवडीची किंमत देत नाही, असं शरद पवार यांनी म्हटल्यानंतर राष्ट्रवादीत अंतर्गत वाद असल्याचं बोललं जात आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

सरकार चीन आणि पाकिस्तानचं नाव घ्यायला का घाबरतंय? आजच्या भाषणानंतर कॉंग्रेसचा सवाल

नवी दिल्ली – स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. मात्र,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

एअर इंडियाने ४८ वैमानिकांना केलं तडकाफडकी बडतर्फ

नवी दिल्ली -लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या असताना आता एअर इंडियानेही आपल्या ४८ वैमानिकांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या वैमानिकांनी गेल्या वर्षी आपला राजीनामा कंपनीकडे...
Read More