शत्रुघ्न सिन्हांच्या काँग्रेस प्रवेशावर सोनाक्षी म्हणाली… – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक राजकीय

शत्रुघ्न सिन्हांच्या काँग्रेस प्रवेशावर सोनाक्षी म्हणाली…

नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या तीन दशकांपासून भाजपमध्ये असलेले आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शत्रुघ्न सिन्हां यांनी भाजप पक्षसोडून 28 मार्चला कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. शत्रुघ्न सिन्हांच्या काँग्रेस प्रवेशावर हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असून त्यांनी निर्णय घेण्यास उशीर केला असल्याचे सोनाक्षी म्हणाली आहे.

काय म्हणाली सोनाक्षी…

मला वाटतं जर तुम्ही कुठे आनंदी नसाल तर तुम्हाला बदल करावा लागतो आणि त्यांनी तेच केलं आहे. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. जयप्रकाश नारायण,अटलजी,आडवाणी यांच्या काळापासून पक्षात असल्याने त्यांना मोठा मान मिळाला आहे. मात्र आता तो सन्मान त्यांना मिळत नाही. मला वाटतं त्यांनी हा निर्णय घेण्यास विलंब केला. हा निर्णय त्यांनी फार पूर्वीच घ्यायला हवा होता. आता काँग्रेससोबत जोडले गेले आहेत. ते आणखी चांगल काम करतील आणि एका बाजूला पडणार नाहीत अशी आशा वाटते.

खासदार अभिनेते सिन्हा शत्रुघ्न सिन्हा गेल्या तीन दशकांपासून भाजपमध्ये होते. जयप्रकाश नारायण,अटलजी,आडवाणी यांच्या काळापासून पक्षात होते. मात्र आता भाजपला रामराम करून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. गेल्या वर्षभरापासून ते सातत्याने भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत होते. 2014 च्या निवडणुकीनंतर आपल्याला मंत्रिमंडळात जागा मिळावी अशी त्यांची इच्छा होती. पण त्यांचा समावेश न झाल्याने ते नाराज झाले होते. मागील काही दिवसांपासून  शत्रुघ्न सिन्हां पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.शत्रुघ्न सिन्हांच्या काँग्रेस प्रवेशाची 6 एप्रिलला औपचारिक घोषणा होणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

जन्मोजन्मी हीच पत्नी मिळो! पुण्यात पुरुषांनी वटवृक्षाला मारल्या फेऱ्या

पुणे – आज राज्यभरात वटपौर्णिमेचा उत्साह आहे. आजच्या दिवशी वडाच्या झाडाला दोरी बांधून सात फेऱ्या मारतात आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा, यासाठी आजच्या दिवशी...
Read More
post-image
देश

नेपाळच्या शाळांमध्ये चीनी भाषेची सक्ती

काठमांडू – नेपाळमधील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चीनी भाषा शिकणे अनिवार्य करण्यात अआले आहे. सध्या चीन आणि नेपाळ हे दोन देश अधिक जवळ येत असून भाषा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लवकरात लवकर राम मंदिर उभारले जाईल – उद्धव ठाकरे

अयोध्या – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि आपल्या १८ खासदारांसह आज अयोध्येत पोहोचले. रामलल्लाचं दर्शन घेऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्य मंत्रिमंडळ विस्तार! पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर सतत होणार्‍या टोलवा टोलवीनंतर अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज रविवारी सकाळी पार पडला असून पहिल्या शपथविधीचा मान काँग्रेस राष्ट्रवादीतून नुकतेच...
Read More
post-image
देश

राजस्थानची सुमन राव ठरली फेमिना मिस इंडिया २०१९

नवी दिल्ली – फेमिना मिस इंडिया या स्पर्धेचा अंतिम टप्पा शनिवारी मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये पार पडला. एकूण ३० स्पर्धकांशी लढत आपल्या सौंदर्य...
Read More