व्हॉट्सअॅपवरही आता ‘ग्रुप कॉल’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या ट्रेंडिंग देश

व्हॉट्सअॅपवरही आता ‘ग्रुप कॉल’

मुंबई – संवाद साधण्याचं अत्यंत लोकप्रिय मॅसेंजिंग अॅप म्हणून ओळखलं जाणारं व्हॉट्सअॅप हे सातत्याने त्यांच्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. आता ही व्हॉट्सअॅपने एक भन्नाट फिचर्स आणले आहे. या नव्या फिचरमुळे आता व्हिडिओ कॉलिंगची मजा केवळ दोघात नव्हे तर ग्रुपमध्ये देखील घेता येणार आहे.

फेसबुकच्या F8 डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये या वर्षाच्या शेवटी व्हॉट्सअॅपवर व्हॉईस आणि व्हिडिओ ग्रुप कॉलिंगची सेवा देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मंगळवार पासून व्हॉट्सअॅपचे हे नवे फिचर सर्वांसाठी खुले झाले आहे. हे फिचर अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही युझर्ससाठी देण्या आले आहे. व्हॉट्सअॅपच्या या ग्रुप कॉलिंग फिचरमध्ये एकाच वेळी चार लोकांना बोलता किंवा व्हिडिओ कॉल करता येणे शक्य होणार आहे.

व्हॉट्सअॅपने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांपासून युझर्स व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल सेवा वापरत आहेत. आता त्यात आणखी एक नवे फिचर अॅड केले जात असून यापुढे मित्रांसह ग्रुप कॉल करता येणार आहे. व्हॉट्सअॅप युझरला सुरुवातीला एका व्यक्तीला कॉल करावा लागेल. त्यानंतर त्या कॉलमध्ये अन्य दोघांचा समावेश करता येऊ शकले. जर तुमच्या व्हॉट्सअॅपवर हे फिचर आले नसले तर गुगल प्ले स्टोअरमधून व्हॉट्सअॅप अपडेट करून घ्यावे लागेल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

विरोधी पक्षातील गटनेत्यांची बैठक सुरू

राज्य विधीमंडळीचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत असून या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांची बैठक विधानसभेचे पक्षनेेते आणि कॉंग्रेसचे आमदार राधाकृष्ण यांच्या शासकीय निवास स्थानी पार...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेडातील ६६ पोलीस कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश; घोटाळ्यातील निवड यादी रद्द

नांदेड – नांदेडात घेण्यात आलेल्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत मोठा घोळ झाला होता़. घोटाळ्याचे हे रॅकेट राज्यभर पसरले असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर घेतलेली लेखी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

हे सरकार फसवे, या सरकारला मतदान करणार नाही- मराठा भगिनी

मुंबई – मुंबईतील आझाद मैदानात गेल्या 16 दिवसांपासून सकल मराठा क्रांती मोर्चाचे आपल्या मागण्यांसाठी उपोषण सुरू होते.  सरकारच्यावतीने आलेले राज्यमंत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासनानंतर अखेर १६...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेडातील माहुरात फर्निचर गोदामास आग, लाखोंचे नुकसान

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर शहरातील आबासाहेब पारवेकर नगर स्थित फायबर फर्निचर साहित्य असलेल्या गोदामास आज सकाळी ७च्या सुमारास भीषण आग लागली. यात...
Read More
post-image
देश

अमृतसरमध्ये धार्मिक स्थळ परिसरात स्फोट; तिघांचा मृत्यू

अमृतसर – धार्मिक स्थळ परिसरात स्फोट झाला असून स्फोटामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला असून १० जण गंभीर जखमी झाले आहेत. दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून ग्रेनेड...
Read More