वैभव तत्त्ववादी करणार ग्रे शेडची भूमिका – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

वैभव तत्त्ववादी करणार ग्रे शेडची भूमिका

मुंबई – ‘फक्त लढ म्हण’, ‘सुराज्य’, ‘हंटर’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘बाजीराव मस्तानी’ अशा हिंदी मराठी चित्रपटांमध्ये चमकलेला मराठमोळा अभिनेता वैभव तत्त्ववादी आता ‘ग्रे’ नावाच्या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या मराठी सिनेमाचा फर्स्ट लुक जारी करण्यात आला. या पोस्टरमध्ये फुटलेल्या काचेतून वैभव तत्त्ववादीचा चेहरा दिसतोय.

आजच्या रंगीत छायाचित्रणाच्या दुनियेत या सिनेमाचे हे पोस्टर चक्क ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट रंगात असल्यामुळे त्याला वेगळाच उठाव आला आहे. आशिष-विजय ही नवी संगीतकार जोडी प्रथमच या सिनेमाला संगीत देणार आहे. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार असलेल्या या सिनेमात वैभवसोबत पल्लवी पाटील आणि मयुरी देशमुख यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असतील. ‘ग्रे’ या सिनेमाचं दिग्दर्शन अभिषेक जावडेकर करणार आहेत. पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार्‍या लक्षणीय चित्रपटांमध्ये रेड बल्ब स्टुडिओच्या ‘ग्रे’ या सिनेमाचा नक्की समावेश करावा लागेल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News क्रीडा देश

विश्वचषक स्पर्धेआधीचे भारतीय संघाचे वेळापत्रक! दोन सराव सामने

मुंबई – आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा येत्या 30 मे पासून सुरू होणार असून या स्पर्धेआधीचे भारतीय संघाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारतीय संघ...
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

लोकसभा निवडणूक विशेष बुलेटीन (23-05-2019)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन ! ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

वंचित आघाडीने अशोक चव्हाण व सुशीलकुमार शिंदेंना हरविले

मुंबई – महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी केला. अशोक चव्हाण यांचा पराभव ‘वंचित’च्या यशपाल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

बंद कर रे टीव्ही!

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, मुंबई अशी जिथे जिथे भाषणे घेतली तेथील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडले. याचा...
Read More
post-image
क्रीडा विदेश

#FrenchOpen फ्रेंच स्पर्धेत जोकोविचला नादाल, फेडररकडून धोका

पॅरिस – येत्या रविवारपासून सुरू होत असलेल्या यंदाच्या वर्षातील दुसर्‍या फ्रेंच ग्रँडस्लॅम अजिंक्यपद स्पर्धेत माजी विजेत्या नोवाक जोकोविचला नादाल-फेडररकडून धोका संभवतो. ही स्पर्धा दुसर्‍यांदा...
Read More