वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा! आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा! आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई – विविध तांत्रिक कामांसाठी आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. आज पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान तर हार्बर मार्गावरील वाशी आणि कुर्ला स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक असेल. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार असून अंधेरी स्थानकात रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद मार्गावर कल्याणहून सकाळी १०.५४ ते ३.५२ पर्यंत मेगाब्लॉक असेल. या काळात सुटणाऱ्या लोकल कल्याण ते ठाणे दरम्यान अप धिम्या मार्गावर चालवण्यात येतील. तसेच ठाणेपर्यंत सर्व स्थानकांवर थांबतील. सीएसएमटीहून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.२२ पर्यंत कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल नेहमीच्या थांब्याव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकात थांबतील. ठाणे ते सीएसएमटी दरम्यान जलद रेल्वे नेहमीच्या थांब्याव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा या स्थानकांत थांबतील.

हार्बर रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक

हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी १०.३४ ते दुपारी ३.०८ पर्यंत एकही लोकल धावणार नाही. सकाळी १०.३४ ते दुपारी ३.०८ वाजेपर्यंत सीएसएमटीहून वाशी, बेलापूर, पनवेलकडे आणि सकाळी १०.२१ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीकडे लोकल धावणार नाही. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते पनवेल, वाशी, कुर्ला मार्गावर विशेष फेऱ्या चालवल्या जातील. तसेच ब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवास करण्याची मुभा रेल्वेने दिली आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक

सिग्नल यंत्रणा आणि ट्रॅकच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने रविवारी बोरिवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी सकाळी ११ ते ३ या वेळेत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी ब्लॉक काळात विरार वसई रोड ते बोरिवली या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्व जलद लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. लोकल मार्गातील या बदलामुळे काही धीम्या आणि काही जलद लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर अंधेरीत पादचारी पुलाच्या कामासाठी गर्डर टाकण्यात येणार असल्याने पश्चिम रेल्वेने रविवार आणि सोमवारदरम्यान मध्यरात्री ब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २५ आणि २६ ऑगस्ट दरम्यान येणाऱ्या मध्यरात्री १.०५ ते पहाटे ५.०५ या वेळेत होणाऱ्या कामामुळे काही मेल तसेच एक्स्प्रेस सांताक्रुझ आणि गोरेगाव या स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरून धावतील. त्यामुळे १२ धीम्या लोकल रद्द करण्यात आल्यात.

दरम्यान, मेगाब्लॉकच्या काळात तिन्ही मार्गांवरील डाऊन आणि अप जलद गाड्या २० मिनिटे उशीराने तर सकाळी ११ ते ५ दरम्यानच्या सर्व धिम्या गाड्या १५ मिनिटे उशीराने धावतील.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट उद्धवस्त केल्या प्रकरणी कारवाईचे आदेश

तिरुवनंतपुरम – ‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट सोमवारी उजव्या विचारसणीच्या कट्टरपंथीयांनी उद्धवस्त केल्यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या...
Read More
post-image
देश

विम्याच्या भरपाईचे दावे वाढले; प्रिमिअम वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून विम्याच्या नुकसान भरपाईचे दावे वाढले आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या विमा कंपन्या आपल्या प्रीमियममध्ये २० ते ४० टक्के...
Read More
post-image
देश

TVS मोटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपातीचा निर्णय

नवी दिल्ली  लॉकडाऊनच्या संकटात आता भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात...
Read More
post-image
विदेश

अमेझॉनच्या जंगलातही पोहोचला कोरोना; ९८० आदिवासींना लागण

ब्रासिलिया – कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. पण आता ज्याठिकाणी लोक कधीही उत्स्फूर्तपणे जात नाहीत, तिथे जाणे टाळतात. अशा जंगल भागातही कोरोना पोहोचला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात; पाण्यातून काढले ५०० नारळ

कोल्हापूर – कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात झाली आहे. तलावात तांबट कमान परिसरात पडलेल्या पूजाअर्चेच्या साहित्यामुळे प्रदुषणामध्ये भर पडत होती. त्यामुळे येथे मासे, कासव मृत...
Read More