वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरचा भारताला धोका – eNavakal
News क्रीडा विदेश

वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरचा भारताला धोका

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी होणार्‍या भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर भारतासाठी धोकादायक ठरू शकतो. यंदाच्या या स्पर्धेत अनुभवी वेगवान गोलंदाजांनी तीन सामन्यांत 10 बळी घेऊन पाकिस्तानतर्फे चांगली कामगिरी केली आहे. पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज वासीम अक्रम यांनी मोहम्मद आमीरला प्रकाशझोतात आणले. त्यानीच आमीरची अचूक निवड केली.
वासीम अक्रम यांचा आदर्श ठेवणार्‍या आमीरने मग या खेळात चांगली प्रगती करून थोड्याच वर्षात पाकिस्तानी संघात स्थान मिळविले. 2009 मध्ये पाकिस्तानतर्फे पदार्पण करणार्‍या आमीरने आपल्या शानदार गोलंदाजीने नामवंत फलंदाजांना चकविले. 2009 मध्ये त्यांनी पाकिस्तानी संघात पदार्पण केले. त्यानंतर गेल्या दहा वर्षांत आमीरने सातत्याने चांगली कामगिरी करून पाकिस्तानची वेगवान गोलंदाजी समर्थपणे सांभाळली आहे.
चेंडू दोन्हीकडून स्विंग करण्यात तो माहीर आहे. तसेच जुन्या आणि नव्या चेंडूवर तो चांगली गोलंदाजी करतो. फलंदाजांचे दोष हेरून आमीर त्यांना आपल्या जाळ्यात अडकवतो.
अचूक दिशा आणि टप्प्यावर सातत्याने सुरेख मारा करण्यात त्याचा हातखंडा आहे. 2017 मध्ये चॅम्पियन चषक स्पर्धेत पाकिस्तानच्या विजयात आमीरचा मोठा वाटा होता. यंदादेखील त्याला विश्वचषक स्पर्धेसाठी अगोदर डावलण्यात आले होते. पण नंतर पंतप्रधान इम्रान खान यांच्या आग्रहाखातर त्याचा समावेश पाकिस्तानी संघात करण्यात आला.
इम्रान खान यांचा विश्वास सार्थ ठरवताना आमीरने तीन सामन्यांत चांगली गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत त्याने प्रथमच 5 बळी घेण्याचा पराक्रम केला. कसोटीत 119 आणि वनडे सामन्यात 70 बळींची नोंद त्याच्या नावावर आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या संपादकीय

(संपादकीय) पत्रकारांना गुलाम समजण्याचा नेत्यांनी माज करू नये – जयश्री खाडिलकर-पांडे

बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या समन्वय बैठकीची माहिती पत्रकारांना कळू नये यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जो खालच्या पातळीचा हीन प्रकार केला त्याचा ‘नवाकाळ’...
Read More
post-image
देश राजकीय

कर्नाटकच्या १५ बंडखोर आमदारांचा भाजपात प्रवेश

बेंगळूरू – सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसच्या 17 बंडखोर आमदारांना पुन्हा निवडणूक लढविण्याचा निर्णय दिला. यापैकी १५ आमदारांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

‘चौकीदार चोर है’ प्रकरणी राहुल गांधींचा माफीनामा सुप्रीम कोर्टाकडून मंजूर

नवी दिल्ली – ‘चौकीदार चोर है’ प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा माफीनामा मंजूर करण्यात आला आहे. तसेच राहुल गांधी यांनी भविष्यात कोणतीही टिप्पणी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राफेलच्या पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने राफेल कराराबाबत दाखल झालेल्या पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

सबरीमाला मंदिर प्रवेशाचा निर्णय सात न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार

नवी दिल्ली – नवी दिल्ली – ऐतिहासिक सबरीमाला प्रकरणावरील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात ३ विरुद्ध २ च्या बहुमताने सात न्यायमूर्तींच्या संविधान पीठाकडे पाठविण्यात आली आहे....
Read More