वृद्ध महिलेला 8 लाखांचा गंडा – eNavakal
गुन्हे मुंबई

वृद्ध महिलेला 8 लाखांचा गंडा

डोंबिवली – पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून एका इसमाने एक वृद्ध महिलेला तब्बल 8 लाखाना गंडा घातल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील वैभव अनेक्स मध्ये शुभांगी परब या 62 वर्षीय महिला राहतात .काही वर्षांपूर्वी त्यांचे पती मयत झाले त्यांना 2007 मध्ये त्यांच्या पतीचे सेवा निवृत्तीची 8 लाख रुपये रक्कम मिळाले होते .त्यांच्या परिचयाचे असणारे याच परिसरात राहणार जयवंत साटम याने त्यांना ही रक्कम एका बँकेत टाकून दुप्पट करून देतो असे आमिष दाखवले .या आमिशला बळी पडत त्यांनी साटम याला पैसे दिले .मात्र बरेच वर्ष उलटूनही याबाबत साटम काहीच सांगत नसल्याने त्यांनी साटम कडे विचारपूरस केली मात्र त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले .या प्ररकणी शुभांगी परब यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसानी साटम विरोधात गुन्हा दाखल केला आहे .

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

महिला स्पेशल लोकलसाठी बदलापुरात सेनेची स्वाक्षरी मोहीम

बदलापूर – बदलापूर येथून छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी गर्दीच्या वेळी महिला स्पेशल लोकल सोडण्याच्या मागणीसाठी बदलापूर येथे शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आज...
Read More
post-image
क्रीडा देश

भारतीय खेळाडूंना पत्नी, प्रेयसीपासून दूर राहण्याचे आदेश

लंडन – टी-20 आणि वन डे मालिका संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना संघ व्यवस्थापनाने एक महत्वाचा आदेश दिला आहे. इंग्लंडविरूद्धचे पहिले तीन सामने होईपर्यंत भारतीय खेळाडूंना...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : उंचे लोग उंची पसंद

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी संपर्क अभियान सुरू केले आहे. म्हणजे समाजातल्या मोठ्याकिंवा प्रतिष्ठित लोकांच्या भेटीगाठी घेण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. प्रत्येक राज्यात जाऊन...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेडात चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमध्ये 4 लाखांची लूट

नांदेड – आज पहाटे 4.50 वाजता चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमधून चोरट्यांनी 4 लाख 24 हजारांचा ऐवज असलेली एक बॅग चोरून नेली आहे. चैन्नई ते नगरसोल जाणारी...
Read More
post-image
महाराष्ट्र

धुळ्यात सेनेचे दोन महानगरप्रमुख तुरुंगात; महालेंना दिला डच्चू

धुळे – शिवसेनेतर्फे धुळ्यासाठी दोन महानगरप्रमुख पदांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरप्रमुख असलेले सतिश महाले भूसंपादन मोबदला हडपल्याप्रकरणी अमळनेरमध्ये दाखल गुन्ह्यात सध्या जळगाव कारागृहात...
Read More