वृत्तविहार – eNavakal
लेख

वृत्तविहार

 

महाभियोगाचा राजकीय महाप्रयोग 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश दीपक मिश्रा यांच्यावरील महाभियोगाची मागणी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावल्यानंतर काँग्रेसतर्फे सर्वोच्च न्यायालयात उपराष्ट्रपतींच्या या निर्णयाला आव्हान दिले गेले होते. या याचिकेसंदर्भात मुख्य न्यायाधिश दीपक मिश्रा यांनी पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ निर्माण करून या याचिकेची सुनावणीची व्यवस्था केली होती. परंतु ही गोष्टदेखील याचिकाकर्ते आणि काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांना मानवली नाही आणि त्यांनी दाखल केलेली विरोधी याचिका मागे घेण्याची घोषणा केली. ज्यांच्याविरुध्द महाभियोगाची तक्रार आहे त्याच न्यायमूर्तींनी घटनापीठाची स्थापना करण्याचे आदेश द्यावेत. हा प्रकार अयोग्य असल्याचे सिब्बल यांचे म्हणणे आहे. परिणामी या घटनापीठाकडून अपेक्षित न्याय मिळेल असे त्यांना वाटत नाही. स्वाभाविकपणे त्यांनी याचिका मागे घेण्याचा राजकीय शहाणपणा दाखवलेला दिसतो. याचिका मागे घेण्यापूर्वी त्यांनी हे घटनापीठ स्थापन करण्याचा आदेश कोणाचा आहे याची विचारणा केली. आणि त्यासंबंधीच्या आदेशाची प्रतही मागितली. परंतु घटनापीठाच्या न्यायमूर्तींनी अशी आदेशाची प्रत याचिकाकर्त्यांना देण्याची गरज नाही. त्यांनी आपल्या अर्जातील मुद्दांवर युक्तीवाद करावा. अशी सूचना संबंधित घटनापीठाने केली. परंतु या उत्तराने समाधान न झालेल्या सिब्बलांनी सरळ माघारीचा निर्णय घेऊन राजकीय हेतू साधण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो.

यातला मुळातला भाग असा आहे की मुख्य न्यायाधिशांविरुध्द महाभियोगाची मागणी करून त्यांनी स्वतःचे आणि काँग्रेस पक्षाचे नुकसान करून घेतले अशी मागणी करीत असताना ज्या मूलभूत गोष्टींचे भान ठेवायला हवे होते ते त्यांनी बाळगले नाही. महाभियोगाची मागणी राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपतींकडे पुरेशा खासदारांच्या संख्याबळाच्या आधारावर करणे अपेक्षित असते. ही मागणी करताना त्याची जाहीर वाच्यता करता येत नाही. परंतु सिब्बल आणि त्यांच्या या मागणीचे समर्थन करणार्‍या इतर राजकीय पक्षांनी थेट पत्रकार परिषद घेऊन न्यायाधिशांविरुध्दचे आरोप जाहीरपणे सांगितले. ही गोष्टच नियमबाह्य ठरली. शिवाय मुख्य न्यायाधिशांविरुध्दच्या आरोपांसाठी ठोस पुरावे त्यांना देता आले नाहीत. त्यांच्या या मागणीसंदर्भात उपराष्ट्रपतींनी अनेक घटनातज्ञांचा सल्ला घेतला. एवढेच नव्हे तर देशातील सर्व मोठ्या विधीतज्ञांनी काँग्रेस पुरस्कृत महाभियोगाची मागणी राजकीयप्रेरित असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. माजी अ‍ॅटर्नी जनरल सोली सोराबजींपासून ते राम जेठमलानींपर्यंत सर्वांनीच सिब्बल यांच्या या मागणीची खिल्ली उडवली होती. महाभियोगाची मागणी करून आपले डोके भींतीवर आपटून घेण्याचा प्रकार काँग्रेसकडून झाला होता. सर्वोच्च न्यायालयातील हा मुद्दा टिकणार नाही. आणि त्याच्या सुनावणीदरम्यान काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ होण्याचीच शक्यता होती. पुढची ही दुस्थिती टाळण्याकरीताच त्यांनी याचिका मागे घेण्याचा सोयीस्कर मार्ग स्वीकारलेला असावा. उशिरा का होईना परंतु सिब्बल यांना राजकीय शहाणपण सुचले. हे काँग्रेससाठी महत्वाचे ठरते. कदाचित आपल्याचविरुध्दच्या महाभियोगाच्या मागणीसाठी मुख्य न्यायाधिशांनी घटनापीठ स्थापनेचे आदेश द्यावेत की देऊ नयेत याबाबत कायदेशीर चर्चा होऊ शकते. परंतु या सगळ्याच प्रकरणाला राजकीय रंग असल्याने हा महाभियोगाचा राजकीय महाप्रयोग लवकरात लवकर संपुष्टात आणणे जास्त योग्य ठरणार होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र राजकीय

बीडमध्ये काकांच्या कारभारावर पुतण्याचा बॅनरबाजीतून निशाणा

बीड- बीडच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच काका-पुतणे आमने-सामने उभे राहणार असल्याने त्यांच्यातील संघर्ष गल्लीबोळातही दिसू लागला आहे. राज्याचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विकासकामांवर त्यांचे पुतणे संदीप...
Read More
post-image
News देश राजकीय

काँग्रेससोबत युती नको, स्वतंत्र लढणार – देवेगौडा

बंगळुरू- कर्नाटकामध्ये मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर कोणासोबतही युती न करता स्वतंत्र लढण्यासाठी तयार राहू, असे माजी पंतप्रधान आणि जनता...
Read More
post-image
News महाराष्ट्र

उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा पूर्ववत

उरण- उरण ओएनजीसीच्या गॅस प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे गेल्या 10 दिवसांपासून बंद असलेला महानिर्मितीच्या उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा कालपासून पूर्ववत सुरू झाला आहे. यामुळे एका...
Read More
post-image
News महाराष्ट्र वाहतूक

बोरोटी रेल्वे यार्डमध्ये ब्लॉक! कलबुर्गी-सोलापूर पॅसेंजर रद्द

सोलापूर- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर वाडी सेक्शनच्या बोरोटी रेल्वे स्थानक यार्डमध्ये उद्या बुधवारी ट्रॉफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या काळात प्रवासी गाड्यांमध्ये...
Read More
post-image
News महाराष्ट्र राजकीय

इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा! बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

अहमदनगर- संगमनेरयेथे मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज दिसल्यानंतर ते बाळासाहेबांच्या विरोधात लढणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र स्वत: इंदुरीकर महाराजांनी हे वृत्त...
Read More