वृत्तविहार : हंगामा आणि अमिताभ बच्चन – eNavakal
लेख

वृत्तविहार : हंगामा आणि अमिताभ बच्चन

एकीकडे राजकारण्यांचा वाटेल ते बरळण्याचा किंबहुना वाटेल त्या गोष्टी करण्याचा शिमगा सुरू असतानाच प्रसिध्दी आणि पैसा या दोन बाबतीत तेवढेच महत्त्व असलेल्या मनोरंजन, क्रिकेट किंवा अन्य कला क्षेत्रात बोटावर मोजण्याइतकेच लोक आहेत की जे आपल्या एकूणच सगळ्या व्यवहारात अतिशय सावधपणे वागताना दिसतात.

ठळकपणाने डोळ्यासमोर येणारी दोन ते तीन नावे आहेत की जे कधीही कोणत्याही वादामध्ये एकतर तोंड खुपसत नाहीत. किंवा त्यांच्यामुळे नवीन वादही निर्माण होत नाहीत. एक म्हणजे गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि कुटुंब, दुसरे नाव म्हणजे सचिन तेंडूलकर आणि तिसरे चिरंतन सुपरस्टार राहणारे अमिताभ बच्चन. अलिकडेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या भक्तांनी अनेक प्रकारे त्यांचे लक्ष वेधण्याचा उद्योग करून बघितला. बच्चन यांच्या घरासमोर होर्डिंग लावून आपण कसे त्यांचे चाहते आहोत हे दाखवून प्रसिध्दी मिळवण्याचा प्रयत्न एका शिवसेना नेत्याने केला. परंतु अमिताभ बच्चन यांच्याकडून या संदर्भात एका शब्दानेही प्रतिक्रिया व्यक्त झालेली नाही. अशाच वाढदिवसाच्यानिमित्ताने एका कार्यक्रमात बच्चन यांना पत्रकारांनी तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्याविषयी छेडले असता त्यांनी जे मार्मिक उत्तर दिले ते सगळ्यांनीच विचार करण्यासारखे ठरते. अमिताभ बच्चन म्हणाले की, ‘ना मै तनुश्री दत्ता हू, ना मै नाना पाटेकर हू।’ या दोन वाक्यामध्ये आपण या विषयावर बोलण्याचे तसे काहीच कारण नाही हे त्यांनी अतिशय सभ्य भाषेमध्ये स्पष्ट केले. कोणतीही झंझट आपल्यामागे लावून घ्यायची नाही नको त्या वादात पडायचे नाही. दुसऱ्यांच्या प्रश्नांना फुकटची उत्तरे देत बसण्यापेक्षा दुसऱ्यांनाच काही अभ्यासपूर्ण प्रश्न विचारून कौन बनेगा करोडपती अशासारख्या कार्यक्रमातून पैसे मिळवत राहायचे हा अमिताभ बच्चन यांचा स्मार्ट असा फंडा आहे आणि ही गोष्ट तितकीच मान्य केली पाहिजे की एखादी घटना घडल्यावर ती सतत वादग्रस्त ठेवण्याकरीता अनेकांच्या प्रतिक्रिया विचारल्या जातात. त्यातून त्या प्रश्नाचे उत्तर तर सापडत नाहीच. उलट प्रश्न विचारणाऱ्यांची गुणवत्ता लक्षात येते. आणि थिल्लर विषयसुध्दा कसे ग्लॅमर होऊ शकतात हे दाखवून द्यायचे. हा प्रकार आपल्या देशात अतिशय सहजपणे घडू लागला आहे.

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमातूनसुध्दा अमिताभ बच्चन यांना तुफान प्रसिध्दी आणि पैसाही मिळतो आहे असे सगळे सुगीचे दिवस सुरू असताना किंवा हंगाम सुरू असताना केवळ हंगामा खडा करने मे बच्चन यांना काहीच रस नाही हे त्यांच्या अलिप्त आणि तटस्थ व्यवहारांवरून दिसून येते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

कॅलिफोर्नियाच्या फेसबुक मुख्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी

कॅलिफोर्निया – कॅलिफोर्निया येथे मेनलो पार्क येथील फेसबुकचे मुख्यालय बॉम्ब ठेवल्याची धमकी एका आज्ञातांनी दिली आहे. याा घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आईच्या अस्ठीचे विसर्जन करायला गेलेल्या ७ जणांचा बुडून मृत्यू

नांदेड – उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आईच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाची वक्रदृष्टी पडली. गऊघाट परिसरात बोट उलटून झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला...
Read More
post-image
देश

के. चंद्रशेखर राव उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता

हैदराबाद – तेलंगणामध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव उद्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

#ElectionResults2018 कोण होईल मुख्यमंत्री?

नवी दिल्ली – मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या पाच राज्यांपैकी फक्त तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

लोणावळ्याची ‘मगनलाल’ चिक्की बंद होणार ?

लोणावळा – लोणावळ्याच्या प्रसिद्ध चिक्कीचे उत्पादक असलेल्या ‘मगनलाल’ चिक्कीला अन्न व औषध प्रशासनाने दणका दिला आहे.  ‘मगनलाल’ चिक्की पैकी एक ‘मगनलाल फूड प्रोडक्ट्स’ या कंपनीला...
Read More