वृत्तविहार : स्थलांतराचा वेधशाळेलाही अंदाज नाही – eNavakal
लेख

वृत्तविहार : स्थलांतराचा वेधशाळेलाही अंदाज नाही

वेधशाळांकडून व्यक्त होणारे अंदाज खरे ठरतीलच याची खात्री नसते. कधी कधी तर वेधशाळांनादेखील त्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजांबद्दलही आश्चर्य वाटत असते. महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज व्यक्त करण्याचे काम गेली 90 वर्षे पुणे वेधशाळेकडून होत होते. पण आता ही वेधशाळाच बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अशा पध्दतीने ऐन पावसाळ्यामध्ये आपली वेधशाळा बंद होईल असा कोणताही अंदाज तिथल्या अधिकार्‍यांना किंवा कर्मचार्‍यांना येऊ नये यावरून एकूणच हवामान अंदाजाचे शास्र काय आहे हेही लक्षात येते. असं म्हणतात की सिमला येथे असलेली ही वेधशाळा 1 एप्रिल 1928 ला पुण्यात स्थलांतरित केली गेली. 1945 पयर्ंत भारतीय हवामान शास्राचे हे मुख्यालय पुण्यात होते. नंतर ते दिल्लीला हलवले गेले. तरीसुध्दा पुणे वेधशाळेचे काम चालू ठेवण्याचा निर्णय त्यावेळी घेतला गेला होता. प्रामुख्याने महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज व्यक्त करण्याचे काम ही वेधशाळा आतापर्यंत प्रामाणिकपणे पार पाडत राहिली. आता म्हणे देशभरातील सगळ्या हवामानाचे अंदाज एकत्रितरित्या दिल्लीहून व्यक्त केले जाणार आहेत. सगळ्याच गोष्टींची सूत्रे दिल्लीतून हलवली जाऊ लागली तर मोठी पंचाईत होईल. दिल्ली ही देशाची राजधानी आहे. ही गोष्ट खरी पण याचा अर्थ हवामानावरची ही सत्ता दिल्लीतून हलवली जावीत. असा जर तिथल्या सत्ताधार्‍यांचा समज असेल तर तो एकाअर्थी चुकीचा ठरतो. मुळात दिल्लीतले हवामान प्रचंड खराब आहे. प्रदूषणाची कमाल पातळी गाठली गेली आहे. आणि असे खराब हवामान असलेल्या राजधानीतून हवामानाचा नेमका अंदाज मिळेल असे तरी कसे समजावे. अर्थात हा विनोदाचा भाग जरी सोडला तरी स्थानिक पातळीवर ठिकठिकाणी किंवा देशाच्या वेगवेगळ्या भागात वेधशाळांची गरज असताना संपूर्ण देशाकरीता एकच वेधशाळा असण्याचा निर्णय चुकीचाच म्हणावा लागतो. एकतर देशाचाच विचार केला तर नागपूर हे देशाचे मध्यवर्ती ठिकाण ठरते. तिथून संपूर्ण देशाच्या हवामानाचे अंदाज व्यक्त होणारे कार्यालय असणे अधिक सोयीचे ठरू शकते. महानगरांमध्ये होणारी सरकारी कार्यालयांची गर्दी कमी करण्याऐवजी वाढवण्याचाच प्रयत्न दिसून येतो. आज दिल्लीमध्ये सरकारी कार्यालयांची संख्या इतकी प्रचंड आहे की दिल्लीच्या एकूण लोकसंख्येमध्ये सत्तर टक्के सरकारी कर्मचार्‍यांचीच संख्या असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत सगळ्याच कार्यालयांची तिथे गर्दी वाढवण्याचा प्रयोग अनाठायी म्हणावा लागतो. 90 वर्षे अस्तित्वात असलेल्या पुणे वेधशाळेला अचानक बंद करण्याचा निर्णय त्याच हवामान खात्याप्रमाणे बेभरोशाचाच वाटू लागतो. गंमतीचा भाग म्हणजे या वेधशाळेलाही आपल्याच स्थलांतराचा अंदाज येऊ नये हे गूढ नव्हे का?

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

मुंबईतील पाणी प्रश्न स्थायी समितीत पेटला

मुंबई  – मुंबईतील पाणी प्रश्न आज बुधवारी पालिका स्थायी समितीत चांगलाच पेटला सर्वपक्षीय सदस्यांनी आक्रमक होत पालिकेला धारेवर धरले पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्याची मागणी...
Read More
post-image
देश

चंद्रशेखर राव आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

हैदराबाद – तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ ़घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीसाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, निमंत्रित पाहुणे उपस्थित...
Read More
post-image
मुंबई

मुंबईत वातावरणातील बदलाने आजार बळावले

मुंबई – दिवसा रणरणते ऊन आणि रात्रीचा गारवा वातावरणातील या बदलामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. सर्दी, खोकला, दमा, त्वचारोगांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. डिसेंबर...
Read More
post-image
विदेश

ब्राझीलच्या कँपीनास शहरात गोळीबारात 5 ठार

साओ पाउलो- ब्राझीलच्या कँपीनास शहराती एका चर्चमध्ये बंदुकधार्‍याने केलेल्या गोळीबारात 5 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली. या घटनेनंतर गोळीबार करणार्‍या व्यक्तीनेही स्वतःवर गोळ्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात आज पहिला गुरुवार

विक्रमगड – शनिवारपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली असून या महिन्यात अनेकांच्या घरात उपवास केला जातो व श्रावण महिन्याप्रमाणेच मास,मच्छी या महिन्यात वर्ज्य केली जाते.या...
Read More