वृत्तविहार : सुधारगृहे की छळछावण्या – eNavakal
लेख

वृत्तविहार : सुधारगृहे की छळछावण्या

उत्तरप्रदेशातील शासकीय महिलावसतीगृहातून १९ महिला बेपत्ता असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यापूर्वी बिहारमधील मुजफ्फरपूर इथल्या शासकीय महिला वसतीगृहातील मुलींना सक्तीने अनैतिक गोष्टी करण्यासाठी बाहेर पाठवले जात असल्याचे प्रकरण पुढे आले आणि ते दडपून टाकण्याचे प्रयत्न एका महिलामंत्र्यानेच केल्याचे समोर आले आहे. महिलांची सुरक्षितता हा विषय अजूनही अतिशय चिंताजनक स्वरूपाचाच असल्याचे यावरून दिसून येते. समाजातल्या अनाथ मुलींच्या संगोपनासाठी शासकीय स्तरावर अशा प्रकारची वसतीगृहे चालवली जातात परंतु तिथली व्यवस्था आणि व्यवहार अतिशय दुर्दैवी स्वरूपाचा असतो. एक तर पुरेशा व्यवस्था तिथे नसतात. आणि विशेष म्हणजे या सर्व महिलांना स्वावलंबी करण्याच्यादृष्टीने कोणतेही ठोस उपक्रम राबवले जात नाहीत त्यांच्या रोजच्या जेवणाखाण्यापासून ते कपड्यांपर्यंत आबाळ होत असते.

सगळाच सरकारी कारभार असल्याने या महिलांची स्थिती वेठबिगारांपेक्षा फार वेगळी नसते. उत्तरप्रदेश, बिहार, दिल्ली राजस्थान, तामिळनाडू या राज्यांमध्ये या महिलांच्या वसतीगृहांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होतात. बिहारमधील मुजफ्फरपूरचे उदाहरण समोर आल्यावर उत्तरप्रदेशातील
महिला वसतीगृहाची पाहणी करणाऱ्या तिथल्या खरे नावाच्या महिला जिल्हाधिकारी त्याठिकाणी गेल्या असताना तिथे केवळ दोनच महिला उपस्थित असल्याचे त्यांना आढळून आले. बाकीच्या महिला कुठे आहेत असे विचारल्यावर त्या वसतीगृहाचे अधिक्षक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यांना तात्काळ निलंबित केले गेले परंतु या महिला कुठे गेल्या याचा पत्ता नसल्याने हे प्रकरण खूपच गंभीर असल्याचे लक्षात येते. म्हणूनच देशभरातील विशेषत्वाने बालसुधारगृह आणि महिला वसतीगृहांमध्ये प्रचंड प्रमाणात गैरप्रकार होत असतात. अनेक ठिकाणची मुले आणि महिला तिथल्या वातावरणाला आणि जाचाला कंटाळून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतात. महाऱाष्ट्रातील चेंबूर येथील महिला सुधारगृहातील महिलांनी दोनवेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. याचा अर्थ शासकीय स्तरावरची ही सगळी सुधारगृहे नावापुरती सुधारगृहे असतात. तिथला कारभार मात्र गुलामांना वागवणाऱ्या
छळछावण्यांप्रमाणेच दिसून येतो. बिहार आणि उत्तरप्रदेशातील या घटना केंद्र आणि राज्य सरकारला जागे करणाऱ्या आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
क्रीडा विदेश

गॅरी स्टेड नवे प्रशिक्षक

वेलिंग्टन – न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांचे माजी फलंदाज गॅरी स्टेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जून महिन्यात अगोदरचे प्रशिक्षक असलेल्या माइक हेसन यांनी...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडाच्या मुंबईच्या घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघणार

मुंबई- म्हाडाची मुंबई शहरसाठी अंदाजे एक हजार घरांची ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघाणार असल्याची शक्यता मुंबई मंडळाच्या कार्यालयातून वर्तविण्यात आली आहे. म्हाडाच्या गृहनिर्माण कोकण मंडळाने मुंबई...
Read More
post-image
News मुंबई

पालिका एच-पूर्व कार्यालयाची ‘पाणी वाचवा’ मोहीम कागदावर

मुंबई- पिण्याचे पाणी वाचवा चोरी रोखा पाणी वाया घालवू नका, अशी जनजगृती मोहीम पालिका एच – पूर्व कार्यालयचे पाणी खाते हाती घेणार होते. पण ही...
Read More
post-image
क्रीडा विदेश

मुरलीने ब्लादिमीरला नमवले

अबुधाबी – अबुधाबी आंतरराष्ट्रीय मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या मुरली कार्तिकेयनने सातव्या फेरीत रशियाच्या ब्लादिमीरला फेडोसीवला पराभूत करून स्पर्धेत खळबळ माजवली. या पराभवामुळे स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीमधून...
Read More
post-image
News मुंबई

महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन

मुंबई – भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले कर्णधार अजित वाडेकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील...
Read More