वृत्तविहार : सीबीएससीत महाराष्ट्राची कामगिरी   – eNavakal
देश महाराष्ट्र लेख

वृत्तविहार : सीबीएससीत महाराष्ट्राची कामगिरी  

नुकत्याच लागलेल्या सीबीएससीच्या दहावी परीक्षा निकालामध्ये महाराष्ट्राने बऱ्यापैकी कामगिरी केलेली दिसते. ठाणे, नवी मुंबई इथल्या काही विद्यार्थ्यांनी आपली अभ्यासातील चमक दाखवून या परीक्षांमध्ये महाराष्ट्र पण तितकाच आघाडीवर राहू शकतो हे दाखवून दिले. आतापर्यंतचा असाच समज आहे की ही परीक्षा म्हटल्यानंतर महाराष्ट्राचे विद्यार्थी त्यामध्ये आपली गुणवत्ता दाखवू शकत नाहीत त्यांना राज्य परीक्षा मंडळाच्या अभ्यासाची सवय असल्याने केंद्रीय परीक्षा मंडळाचा अभ्यास म्हणजेच सीबीएससी परीक्षेचा अभ्यास त्यांना झेपत नाही. जोपर्यंत या सीबीएससीच्या परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या एका विशिष्ट मर्यादेपर्यंत होती तोपर्यंत विद्यार्थी इथल्या गुणवत्ता यादीत चमकत नव्हते किंवा त्यांना तशी संधी मिळत नव्हती.

विशेषतः दिल्ली किंवा उत्तर भारतातील आणि दक्षिणेतील काही राज्ये आपला प्रभाव दाखवू शकले. आता मात्र महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये सीबीएससी अभ्यासक्रमाच्या शाळा सुरु झालेल्या आहेत. स्वाभाविकपणे विद्यार्थ्यांची संख्याही वाढलेली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा मात्र या परीक्षेत पहिल्या शंभरात महाराष्ट्रातील जवळजवळ वीस विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिध्द केली. हे प्रमाण भविष्यकाळात आणखी वाढू शकते कारण यासाठी आवश्यक असणारा सराव करून घेणाऱ्यांचेही प्रमाण वाढलेले आहे. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमाचा ज्या पध्दतीने बाऊ किंवा दडपण निर्माण केले जाते त्यासंदर्भात विचार होण्याची आवश्यकता आहे. विशेषतः या विद्यार्थ्यांच्या मनावर जो ताण निर्माण होतो तो कमी केला पाहिजे आणि खेळाबरोबरच अन्य कलागुणांना त्यांना जोपासता आले पाहिजे.

शिक्षण हे केवळ गुणवत्तेसाठी नाही. तर एकूण जगण्याविषयीचा आत्मविश्वास वाढावा यासाठी असते. अलिकडच्या काळात तर दहावी बारावीत कमी गुण मिळवलेलेविद्यार्थी विनाअनुदानित महाविद्यालयांमधून विविध प्रकारचे अभ्यासक्रम चांगल्या गुणवत्तेने पूर्ण करतात. एवढेच नव्हे तर पदवी प्राप्त केल्यानंतर आपापल्या क्षेत्रांमध्ये ते उत्तम कामगिरीही करून दाखवतात. त्यामुळे हे शैक्षणिक कर्तृत्व केवळ गुणवत्तेवर आधारित नाही तर आपण केलेला अभ्यास हा जीवनाच्या विविध क्षेत्रात उपयोगात कसा आणायचा यावर खऱ्या अर्थाने अवलंबून असतो. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट एवढीच आहे की अनुत्तिर्ण होणाऱ्यांचे प्रमाण हळु हळू कमी होत चालले आहे तरी देखील या परीक्षेत जवळपास दीड लाख विद्यार्थी नापास झाले. त्यांनी निराश होता कामा नये. आणि त्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी राज्यात दहावीच्या अनुत्तिर्ण विद्यार्थ्यांसाठी जो पॅटर्न राबवला जातो तो सीबीएससीसाठी राबवला जायला हवा. पुढच्या दीड दोन महिन्यात राहिलेले विषय देण्याची त्यांना संधी दिली गेली पाहिजे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही ‘आरे वाचवा’ मोहीमेत

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या वृक्षतोडीला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईकरांच्या रोषामध्ये अधिकच वाढ झाली आहे. आज रविवारी...
Read More
post-image
लेख

परामर्ष : इंग्रजीमुळे राष्ट्रभाषा कुपोषित

हिंदी भाषा दिवसाच्या निमित्ताने देशभरात विशेषतः हिंदी भाषिक राज्यांमध्ये बरेच कार्यक्रम झाले. परंतु अन्य राज्यांमध्ये या राष्ट्रभाषेविषयी हवी तशी आस्था दाखवली गेलेली नाही. किंबहुना...
Read More