वृत्तविहार : सलाईनवरची लाईफ लाईन – eNavakal
लेख

वृत्तविहार : सलाईनवरची लाईफ लाईन

मध्यरेल्वेचा खेळखंडोबा काही संपायला तयार नाही गणेशोत्सवाची धामधुम सुरू असतानाच मध्यरेल्वेने आपल्या अकार्यक्षमतेचा धिंगाणा घालून गणेशभक्तांपुढे विघ्ने निर्माण करण्याचा प्रकार केला आहे. आसनगाव ते कसारा दरम्यान रेल्वेची दुरूस्ती व्हॅनच रुळावरून घसरली तसेच ओव्हरहेड वायर तुटण्याचा प्रकार घडला परिणामी कामावर जाणाऱ्या अनेक चाकरमान्यांचे हाल झाले.

मुंबईकडे येणारी राज्यराणी एक्सप्रेस, कुर्ला मनमाड ही गाडीदेखील रद्द केली गेली. शिवाय सकाळच्यावेळी कसार्र्याहून मुंबईकडे येणाऱ्या सगळ्या उपनगरी गाड्या रद्दझाल्याने लाखो लोक कामावर पोहचू शकलेले नाहीत कालच्या गणेशप्रतिष्ठापनेचा सोहळा आटोपून परत येणाऱ्याचेही हाल झाले. ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर रेल्वेचा कारभार हा आवाक्याबाहेर जात असल्याचे म्हणावे लागते. हे प्रकार सातत्याने होत असल्याने रेल्वे किंवा केंद्र सरकारची एकूणच इच्छाशक्ती अपघातग्रस्त असल्याचे म्हणावे लागते.

मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय महानगरीची लाईफलाईन म्हणून उपनगरीय सेवेचा उल्लेख केला जात असतो. परंतु ही लाईफलाईन कायमच सलाईनवर असल्याचे पाहायला मिळते. आठवड्यातून दोन तीनवेळा तरी रेल्वेचा गोंधळ उडाल्याचे प्रकार घडतात.लोकांनी हे किती दिवस सहन करायचे असेही वारंवार विचारले जात असले दुर्दैवाचा भाग असा आहे की नोकरदारवर्गापुढे वेळेच्या आणि शक्तीच्या मर्यादा येतात. सरकारला जाब विचारण्याकरीता ज्या संघटित आंदोलनाची आवश्यकता असते त्यासाठी वेळ दिला जाऊ शकत नाही. सामान्य प्रवाशांची ही अडचण सरकारच्या पथ्यावर पडते आणि त्याचा अर्थ लोक आहे ती परिस्थिती सहन करू शकतात. असाही त्याचा गैरअर्थ काढला जातो. गेल्या चार वर्षातया प्रकारांनी उच्चांक गाठला आहे. सुरेश प्रभू यांचेयाच कारणांमुळे खाते बदलले गेले. तर आता नवीन रेल्वे मंत्री येऊनही परिस्थिती फारसा फरक पडलेला दिसत नाही. कदाचित कोणत्या तरी मोठ्या उद्रेगाची रेल्वे वाट बघत असावी असे दिसते. भविष्यकाळामध्ये रेल्वेमध्ये किती सुधारणा होईल याची कोणीही खात्री देऊ शकत नाही मात्र आता एकूणच लोकांच्या सहनशीलतेचा अंत होऊ लागला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात

नवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम        

अखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप

मुंबई – बेस्टच्या संपात शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...
Read More