वृत्तविहार : सर विश्वेश्वरैय्या आणि आजचे अभियंते   – eNavakal
लेख

वृत्तविहार : सर विश्वेश्वरैय्या आणि आजचे अभियंते  

दरवर्षी 15 सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणूनसाजरा होत असतो. सर विश्वेश्वरैय्या यांच्याविषयी आदरांजली व्यक्त करण्याकरीता हा दिवस साजरा होत असतो. ते स्वत सिव्हील इंजिनिअर होते. परंतु एम ई पर्यंतच्या शिक्षणाने त्यांच्या गुणवत्तेला आणखीनच संधी मिळाली. काही काळते महाराष्ट्र शासनाच्या सेवेतही काम करीत होते. सर्वप्रथम धुळे जिल्ह्यातील नकाणे येथील एका तलावाचे अतिशय वेगळ्या पध्दतीचे बांधकाम करून त्यांनी जलसाठा करण्याची नवी पध्दत रुढ केली.

आज असलेली जलस्वराज्य कल्पनेची सुरूवात तिथूनच झाली असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. कर्नाटकात काही धरणांचे बांधकाम करणारे पूलबांधणीतले नवीन तंत्रज्ञान सांगणारे किंबहुना अभियंता हा देशाच्या विकासात्मक बांधणीचा कसा पाया असू शकतो त्याचा आदर्श त्यांनी घालून दिला. अशा या गुणसंपन्न विश्वेश्वरैय्या यांना भारत सरकारने भारतरत्न हा बहुमान देऊन सन्मानित केले होते. 101 वर्षे आयुष्य जगलेले हे व्यक्तिमत्व सरकारी सेवेत राहूनही शेवटपर्यंत शंभरनंबरी सोन्याप्रमाणे लखलखत राहिले होते. त्यांच्या या आदर्शांचे स्मरण करण्याकरीता महाराष्ट्रातल्या किती अभियंत्यांनी पुढाकार घेतला हे तपासले पाहिजे. उलट आज अभियंता म्हटला की तो पैसे खाणाराच असेल याची लोकांना खात्री वाटते.

लाचलुचपत खात्याकडून पकडल्या जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये अभियंत्यांचीच संख्या जास्त असते त्यातही नेमक्या बांधकाम क्षेत्रातीलच अभियंत्यांचा त्यात सर्वाधिक समावेश असतो. अशावेळी विश्वेश्वरैय्यांसारख्यांचे आदर्श पाहिल्यानंतर आजचे अभियंते हे त्याला काळीमा फासण्याचेच काम करीत आहेत की काय असे वाटू लागते. म्हणूनच सरकारीपातळीवरून जाणीवपूर्वक हा अभियंतादिन स्वच्छ प्रशासन आणि स्वच्छ चारित्र्यदिन म्हणूनही पाळला पाहिजे. पाया भक्कम असेल तर इमारत डौलाने उभी राहील.

अभियंता स्वच्छ असेलतर देशाची बांधणीही अभिमानास्पदच असेल यात काही शंका नाही. अर्थात याकरीता राज्यकर्त्यांमध्येदेखीलअशा प्रकारच्या स्वच्छ चारित्र्याचा अनुभव येणे आवश्यक आहे. परंतु दुर्दैवाने राज्यकर्त्यांबाबतच अशी प्रतिमा नसल्यामुळे अभियंत्यांमध्ये त्याचा अभाव दिसून येतो. अर्थात राज्यकर्त्यांपेक्षाही जरविश्वेश्वरैय्या यांचे जीवन हे अधिक प्रेरणादायी असल्याने अशा उज्ज्वल व्यक्तीमत्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणे जास्त योग्य ठरते. एकीकडे भारत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे आणि अशा विकासात्मक कार्यक्रमांमध्ये अभियंत्यांची मोठी भूमिका दिसून येते. दुर्दैवाने आज भारतात अभियंते निर्माण करणाऱ्या महाविद्यालयांचीदेखीलरेलचेल झालेली आहे. परंतु तिथेसुध्दा देणग्या देऊन प्रवेश घ्यावा लागतो. आणि प्रचंड शुल्क भरून अभियंत्याचे शिक्षण पूर्ण करावे लागते. अशी व्यक्ती शिक्षणावर झालेलाखर्च भरून काढण्यासाठी लाचखोरीचाच मार्ग स्वीकारते. म्हणूनच शिक्षणापासूनच विश्वेश्वरैय्या यांच्या आदर्शांचे स्मरण करून दिले पाहिजे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

विम्याच्या भरपाईचे दावे वाढले; प्रिमिअम वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून विम्याच्या नुकसान भरपाईचे दावे वाढले आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या विमा कंपन्या आपल्या प्रीमियममध्ये २० ते ४० टक्के...
Read More
post-image
देश

TVS मोटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपातीचा निर्णय

नवी दिल्ली  लॉकडाऊनच्या संकटात आता भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात...
Read More
post-image
विदेश

अमेझॉनच्या जंगलातही पोहोचला कोरोना; ९८० आदिवासींना लागण

ब्रासिलिया – कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. पण आता ज्याठिकाणी लोक कधीही उत्स्फूर्तपणे जात नाहीत, तिथे जाणे टाळतात. अशा जंगल भागातही कोरोना पोहोचला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात; पाण्यातून काढले ५०० नारळ

कोल्हापूर – कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात झाली आहे. तलावात तांबट कमान परिसरात पडलेल्या पूजाअर्चेच्या साहित्यामुळे प्रदुषणामध्ये भर पडत होती. त्यामुळे येथे मासे, कासव मृत...
Read More
post-image
महाराष्ट्र

साताऱ्यात २४ तासांत २७ जण कोरोना पॉझिटिव्ह; तर दोघांचा मृत्यु

सातारा – सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २७जण पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांचा आकडा ३३६ वर पोहचला आहे. तसेच या कालावधीत वाई तालुक्यातील दोन कोरोनाबाधीत...
Read More