वृत्तविहार : व्हायब्रंट गुजरात बॅकफुट महाराष्ट्र          – eNavakal
लेख

वृत्तविहार : व्हायब्रंट गुजरात बॅकफुट महाराष्ट्र         

राज्याचा औद्योगिक विकास त्याच धडाडीने आणि व्यापक हेतूने होऊ शकतो. केवळ प्रसिध्दी आणि धोरणांमधला धरसोडपणा उपयोगाला येत नाही. एकेकाळी उद्योगक्षेत्रात पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता मागे फेकला जात आहे. शेजारचा गुजरात खरोखरच व्हायब्रंट पध्दतीने आघाडी घेत असल्याचे दिसते. गेल्या चारवर्षात सातत्याने व्हायब्रंट गुजरात नावाचा उपक्रम राबवून या राज्याने उद्योग विकासाबाबत आपण किती उत्सुक आहोत हे दाखवून दिले. महाराष्ट्रात झालेली एडव्हांटेज महाराष्ट्र हा एकमेव कार्यक्रम सोडला तर उद्योगांच्या वाढीसाठी ठोस प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. खरे तर मेक इन इंडियाची सर्वात पहिली जागतिक परिषद मुंबईत भरवली गेली त्यावेळी महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचे कागदी घोडे नाचवले गेले. काही लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात झाल्याचे चित्र निर्माण केले गेले. त्या मेक इन इंडियाच्या एवढ्या मोठय़ा परिषदेनंतर त्याचा पाठपुरावा करणारा एकही प्रयत्न झाल्याचे दिसत नाही.

मेक इन इंडियाच्या तीन दिवसाच्या कार्यक्रमाचा समारोप चौपाटीवरच्या लावणीमहोत्सवाने होत असताना त्यालाही आग लागली. आणि एवढ्या मोठ्या जागतिक परिषदेचे नियोजनही धड स्वरुपाचे नसल्याचे त्याचवेळीस्पष्ट झाले. मेक इन इंडिया परिषद मुंबईत झाली. पण त्यातला एकही उद्योग महाराष्ट्रात उभा राहिला नाही. त्यानंतर मेक इन महाराष्ट्राची उडती तबकडी आकाशात भिरकावली गेली. ती पण तितक्याच वेगाने खाली कोसळली. उलट जे उद्योग महाराष्ट्रासाठी घातक आहेत त्याचा आग्रह धरण्याचे काम राज्यसरकारने केले. नाणार प्रकल्पासाठी सरकारने आपली प्रतिष्ठाही पणाला लावली. त्याऐवजी महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात लघु आणि मध्यम उद्योगांचे जाळे निर्माण करण्यावरसरकारने भर दिला असता तर तो जास्त संयुक्तिक ठरला असता. परंतु सरकारला उद्योगवाढीत स्वारस्यच नसल्याने शेजारचा गुजरात मात्र सातत्याने राज्याच्या औद्योगिक वाढीवर लक्ष केंद्रित करताना दिसतो. महाराष्ट्राने स्वतःचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. नको त्या गोष्टींचा आग्रह धरून पैसा खर्च करण्यापेक्षा या राज्याचा औद्योगिक आणि आर्थिक विकास प्रकल्पांचा पाठपुरावा करायला हवा. आज जरी आकडेवारीचा आधार घेतला तरीसुध्दा गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकल्याचेच दिसून येईल. मुंबईसारखी आर्थिक राजधानी महाराष्ट्राकडे असताना राज्याला कर्जबाजारी राहावे लागते. आणि पुन्हा उद्योगवाढीतही माघार घ्यावी लागते ही गोष्ट केवळ अपमानजनक नव्हे तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का पोहचवते. मेक इन इंडियाच्या जंगी प्रदर्शनानंतर तसे उपक्रम राबवणारे एक दोन प्रयत्न जरी झाले असते तरीसरकारची उद्योगवाढीमागची प्रामाणिकता दिसून आली असती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

येडीयुरप्पा अडचणीत! मंत्री, आमदार नाराज

बंगळुरू – काँग्रेस, जनता दल (सेक्युलर) व अपक्ष आमदारांना फोडून, कुमारस्वामी सरकार पाडून कर्नाटकात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या येडीयुरप्पा सरकारलाच आता आमदारांच्या बंडखोरीचा सामना करावा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

मंगला एक्स्प्रेसचं इंजिन बिघडलं! मध्य रेल्वेचा आजही खोळंबा

ठाणे – सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे खोळंबली असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. टिटवाळा येथे मंगला एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कसाऱ्याच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

…तर पुन्हा विमा कंपन्यांविरोधात आंदोलन! उद्धव ठाकरेंचा दोन्ही सरकारना इशारा

मुंबई – महाराष्ट्रातील पूरसमस्या ओसरल्यावर शिवसेनेने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पीक विमा प्रश्‍नावर पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेने जून महिन्यात शेतकर्‍यांच्या पीक विम्याचे पैसे न...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

संभाजी ब्रिगेडकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

औरंगाबाद – राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यंदा संभाजी ब्रिगेड संघटनाही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी,...
Read More
post-image
देश

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर, कार्यालयांवर ईडीचे छापे

नवी दिल्ली – दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या जेट एअरवेजच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने छापेमारी केली आहे. तसेच जेट एअरवेजचे संस्थापक नरेश...
Read More