वृत्तविहार : वॉटर कप आणि कपभर वॉटर – eNavakal
लेख

वृत्तविहार : वॉटर कप आणि कपभर वॉटर

पावसाळा सुरू असतानाच दुष्काळावर मात करणाऱ्याचे सत्कार करण्याची कल्पनाही अफलातून म्हणावी लागेल. अभिनेता आमिर खान याच्या पुढाकाराने राज्यामध्ये पाणी
फाऊंडेशनचे काम सुरू झाले. महाराष्ट्रातल्या ७५ तालुक्यांमध्ये पाणी कसे वाचवता येईल किंवा असलेल्या पाणी साठ्यांची क्षमता कशी वाढवता येईल यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने काही उपक्रम राबवले गेले. लोकांच्याच मदतीने ही पाणी वाचवण्याची मोहीम सुरू झालेली आहे. यासाठी काही प्रमाणात पाणी फाऊंडेशनकडून आर्थिक मदत केली जाते. पण गावांचे पाणीप्रश्न सुटावेत दुष्काळाची झळ कमी व्हावी आणि भविष्यकाळातल्या या संकटावर अधिक मात करता यावी हा त्यामागचा उद्देश आहे. स्वाभाविकपणे अशा उपक्रमांमध्ये नाटक, चित्रपटातील सेलिब्रिटी उतरल्या तर लोकांमध्ये उत्साह थोडा वाढतो. याच पध्दतीने नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनीदेखील शेतकऱ्यांच्या मदतीकरता नाम फाऊंडेशन सुरू केले आहे. त्यालाही लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो. हे सगळे अभिनेते खेड्यामध्ये प्रत्यक्ष जाऊन लोकांमध्ये मिसळतात. त्या कामामध्ये सहभागी होतात. म्हणून लोकांचाही उत्साह वाढतो.

लोकांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाला अधिक प्रोत्साहन देण्याकरीता आमिर खानने सत्यमेव जयते वॉटर कप अशी स्पर्धा ठेवली होती त्यामधील विजेत्यांना पुरस्कार देण्याचा कार्यक्रम पुण्यातल्या एका स्टेडियममध्ये पार पडला. यावेळी सर्व राजकीय पक्षांचे नेते आवर्जून उपस्थित होते. अभिनेत्यांबरोबरची प्रसिध्दीची संधी राजकीय नेते कधीही सोडत नाहीत. यामधून हे राजकीय नेते पाण्यासाठी एकत्र आले असा त्यातून अर्थ काढला गेला. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. पाण्यासाठी ते केवळ भांडणे जुंपण्याचेच काम करू शकतात. हा केवळ पुरस्कार वितरण सोहळा असल्यामुळे त्यांनी तिथे हजेरी लावली. चांगल्या कामासाठीही ते जर एकत्र आले नाहीत तर कपभर वाॅॅटरमध्ये डुंबण्याची त्यांच्यावर वेळ येईल. काही का असेना भविष्यातील कपभर पाण्याची चिंता लक्षात घेऊन अशा प्रकारची वाॅॅटर कप स्पर्धा आयोजित केली जात असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे. जगण्याचा आधार एकमेव पाणी हाच असतो. हे सत्य समजून घेऊन आमिर खानचे हे सत्यमेव जयते यशस्वी होऊ शकते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

२ ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंद – केंद्राची सूचना

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ ऑगस्ट रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्क्रमातून ‘प्लास्टिकमुक्त अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली होती. महात्मा गांधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More