वृत्तविहार : वारी सरकारला भारी – eNavakal
लेख

वृत्तविहार : वारी सरकारला भारी

पंढरपूरच्या वारीची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्यांचे वेळापत्रकही घोषित झाले. जवळपास दीड महिना हा पालखी सोहळा चालत असतो. भक्तीचा प्रकार आहे तितकाच तो सामाजिक एकतेचा सत्प्रवृत्ती वाढीला लावण्याचा समाजातला सद्भाव जागृत करण्याचा मौलिक भाग ठरतो. स्वयंस्फूर्तीने आणि तितक्याच नियोजनपूर्वक वारीची आखणी केली जाते. हे पाहिल्यावर निदान सरकारने आपली स्वतःची जबाबदारी ओळखली पाहिजे. परंपरेने निश्चित झालेले वारीचे मार्ग अधिक व्यवस्थित करीत असताना ठिकठिकाणी स्वच्छतेच्या आणि विश्रांतीच्या सोयीसुविधा दिल्या गेल्या पाहिजेत. ज्यामधून वारकऱ्यांना आपल्या या समृध्द परंपरेचा अधिकाधिक अभिमान वाटू शकेल किंवा तो तितक्याच मनःपूर्वक मिरवता येईल.

महाराष्ट्राला लाभलेली ही पांडुरंग भक्तीची प्रभावळी टिकवून ठेवण्यामध्ये उत्स्फूर्त अशा वारकरी संप्रदायाच्या नियोजनाचा मोठा वाटा आहे. सरकारला विठ्ठल मंदिरातून भरपूर उत्पन्न मिळते. त्या उत्पन्नापैकी किमान सत्तर टक्के भाग हा वारीच्या नियोजनाकरीता वापरला पाहिजे आणि तीस टक्के भाग मंदिर व्यवस्थापनावर खर्च झाला पाहिजे. दुर्दैवाने विठ्ठल मंदिरातील उत्पन्नाचा कोणताही भाग प्रत्यक्ष वारीसाठी उपयोगात आणला जात नाही. इतर संस्थांना मदत करण्यासाठीही त्यातला पैसा वापरला जातो. परंतु पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आणि वर्षभरातील मोठ्या संख्येने निघणारी आषाढी वारी याचा जर विचार केला तर मंदिरात जमा होणाऱ्या देणगीचा आणि दानाचा त्याच कारणासाठी सर्वाधिक उपयोग होईल असे, पाहिले गेले पाहिजे. अजूनही पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीची स्वच्छता, तिच्या पाण्याचा प्रवाह, वारकऱ्यांसाठी सर्व सोयींयुक्त निवारा आणि प्रसाधनगृह यांची वानवा आहे. मंदिर परिसराचे नियोजन करण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. त्याचे काम एका परदेशी कंपनीला दिल्याचे वृत्तही प्रकाशित झाले होते. त्या कामाचे पुढे काय झाले किंवा ते पूर्ण करण्याचा नेमका कालावधी काय याबाबत खुलासा झालेला नाही. ही गोष्ट खरी आहे की प्रत्यक्ष पालखी किंवा वारकऱ्यांसाठी विविध मार्गाचे नियोजन करीत असताना प्रत्यक्ष मंदिरात जाण्यासाठी असलेले मार्गदेखील विस्तारले गेले पाहिजे. तिथला परिसर अधिकाधिक मोकळा करून जास्तीत जास्त लोकांना सहजपणाने दर्शनाची सोय उपलब्ध झाली पाहिजे. परंपरेचे वैशिष्टय़ लक्षात घेताना त्याच्याशी संबंधित जाणिवांचे आकलन झाले पाहिजे. म्हणूनच सरकारने कोणत्याही प्रकारची काटकसर किंवा दीरंगाई न करता निदान पंढरपूरच्या वारीचे आदर्श नियोजन करून दाखवले पाहिजे. उलट अधिकाधिक तरूण पिढी या सत्संगासाठी जोडली कशी जाईल आणि तरूणांमध्ये वारीच्या माध्यमातून सामाजिकतेचे भान कसे वाढीला लागेल, असाही प्रयत्न सरकारकडून केला गेला पाहिजे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

प्रचारासाठी मी पुन्हा येणार आहे, तेव्हा निवडणुका जिंकूच! आदित्य ठाकरे

धुळे – युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही. नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी आहे’, असे...
Read More
post-image
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे उद्या नाशिक शहरात जाणार

नाशिक – शिवसेना नेते आणि युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही....
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : सोज्वळ अभिनेत्री उमा भेंडे

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म ३१ मे १९४५ साली कोल्हापूर येथे झाला. सोज्वळ अभिनेत्री म्हणून उमा भेंडे यांनी मराठी रसिक मनावर...
Read More
post-image
देश

सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता! ३६ हजाराच्या घरात जाणार

मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने सोने महागण्याची चिन्हे दिसत आहेत. आज सोन्याचा भाव सर्वाधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याच्या विचारात...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरच्या सातपाटी परिसरात यंदा पापलेटच्या उत्पादनात घट

पालघर – राज्यासह जगभरात निर्यात होणार्‍या पालघरच्या सातपाटी परिसरातील पापलेट या मत्स्याच्या प्रकारामध्ये यंदा प्रचंड घट झाली आहे. पापलेटचे उत्पादन गेल्या हंगामापेक्षा 190 टनांनी घटले...
Read More