वृत्तविहार : वन्य प्राण्यांची होणारी हानी – eNavakal
लेख

वृत्तविहार : वन्य प्राण्यांची होणारी हानी

जिथे मनुष्याच्या जीवनाची शाश्वती देता येत नाही. तिथे प्राण्यांना जगवण्याची हमी कोण घेणार असा प्रश्न निर्माण होतो. निसर्गाच्या रचनेमध्ये प्रत्येक प्राण्याला जगण्याचा अधिकार दिला गेला आहे. अगदी किड्यामुंग्यांपासून ते वाघ, सिंह यासारख्या हिंस्र प्राण्यांनासुध्दा निसर्गाने त्या त्या पध्दतीने सामावून घेतले आहे किंवा जगण्याची संधी दिली आहे. त्यांच्यासाठी खास जंगलांची निर्मितीही केली आहे. मनुष्याला या प्राण्यांचा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून उपयोगही होत असतो. खरे सांगायचे तर या सगळ्या जीवसृष्टीचे रहस्य असे आहे की सर्व प्रकारचा समतोल साधण्याचा प्रयत्न करते.

जीवो जीवस्य जीवनम् हे या सृष्टीच्या रचनेचे एक सूत्र जरी असले तरी निसर्गाविषयीचे आकर्षण टिकवून ठेवण्याचे कामही प्राणीसृष्टी करते असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. म्हणूनच तर मोराला आपण राष्ट्रीय पक्षी म्हणून गौरवतो. तर सिंहाला जंगलाचा राजा म्हणूनच मान दिला जातो. शिवाय त्याचा हा रूबाब भुरळ घालणारा असल्यामुळेच त्याला भारताच्या अशोकस्तंभावरही स्थान दिले गेले. वेगवेगळ्या ठिकाणी अभयारण्ये तयार करून त्या प्राण्यांचा निरीक्षणापुरताही त्याला आनंद मिळवायचा असतो. मात्र आता प्रचंड वाढत्या नागरीकरणामुळे या प्राण्यांनाही जगणे धोक्याचे वाटू लागले आहे. माणसाला माणसाचा भरोसा न वाटणे हे अलिकडे जितके स्वाभाविक मानले जाते तितकेच ते प्राण्यांच्याबाबतीतही खरे ठरू लागले आहे. गेल्या आठवड्यात सोलापूर जिल्ह्यात सतरा मोरांचा एकाचवेळी मृत्यू झाला तर आता महाराष्ट्रात जानेवारी ते जुलै या सात महिन्यात ६८ बिबट्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आणि याची जी कारणे समोर आली ती या नागरीकरणाचीच समर्थन करणारी आहेत.

जंगलांमधून रस्त्यांची निर्मिती केली जात आहे तिथून जाणाऱ्या वाहनांच्या धडकेमध्ये काही बिबटे ठार झाले. तर काही ठिकाणी त्यांच्या चोरून शिकारीही केल्या आहेत. परंतु अशा पध्दतीने या वन्य प्राण्यांचे नामशेष होणे एकूणच सृष्टीला किंवा निसर्गाच्या नियमाविरूध्द म्हणावे लागते. प्राणी सहसा मनुष्याच्या प्रांतात प्रवेश करीत नाहीत परंतु मनुष्यच प्राण्यांच्या परिसरात घुसखोरी करीत असल्याने आज प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
क्रीडा विदेश

गॅरी स्टेड नवे प्रशिक्षक

वेलिंग्टन – न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांचे माजी फलंदाज गॅरी स्टेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जून महिन्यात अगोदरचे प्रशिक्षक असलेल्या माइक हेसन यांनी...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडाच्या मुंबईच्या घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघणार

मुंबई- म्हाडाची मुंबई शहरसाठी अंदाजे एक हजार घरांची ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघाणार असल्याची शक्यता मुंबई मंडळाच्या कार्यालयातून वर्तविण्यात आली आहे. म्हाडाच्या गृहनिर्माण कोकण मंडळाने मुंबई...
Read More
post-image
News मुंबई

पालिका एच-पूर्व कार्यालयाची ‘पाणी वाचवा’ मोहीम कागदावर

मुंबई- पिण्याचे पाणी वाचवा चोरी रोखा पाणी वाया घालवू नका, अशी जनजगृती मोहीम पालिका एच – पूर्व कार्यालयचे पाणी खाते हाती घेणार होते. पण ही...
Read More
post-image
क्रीडा विदेश

मुरलीने ब्लादिमीरला नमवले

अबुधाबी – अबुधाबी आंतरराष्ट्रीय मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या मुरली कार्तिकेयनने सातव्या फेरीत रशियाच्या ब्लादिमीरला फेडोसीवला पराभूत करून स्पर्धेत खळबळ माजवली. या पराभवामुळे स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीमधून...
Read More
post-image
News मुंबई

महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन

मुंबई – भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले कर्णधार अजित वाडेकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील...
Read More