वृत्तविहार : रेडीरेकनरचे दर आणि बिल्डरांचे घर – eNavakal
लेख

वृत्तविहार : रेडीरेकनरचे दर आणि बिल्डरांचे घर

राज्य सरकारने रेडीरेकनरचे दर तसेच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षापासून या दरांमध्ये बदल केला गेलेला नाही. अर्थात सध्या आचारसंहिता असल्यामुळे आणि निवडणुकांचा धुमधडाका असल्याने रेडीरेकनरच्या दराबाबत कोणताही निर्णय घेणे राज्यसरकारला राजकीयदृष्ट्या त्रासदायकच ठरले असते. कारण आचारसंहितेमुळे दर कमी करू शकत नाही. कारण यामुळे मतदारांना प्रभावित केल्याचा ठपका आयोगाकडून ठेवला जाऊ शकतो आणि दर वाढवले तर मतदार नाराजही होऊ शकतो. कारण या रेडीरेकनरच्या दराचा संबंध जागांशी आणि घरांशी येतो. हे दर वाढले की लागलीच बिल्डरांकडून घरांच्या किंमती वाढवल्या जातात. गेल्या तीन वर्षापासून तर घरबांधणी क्षेत्र बऱ्यापैकी अडचणीत सापडले आहे. अडचणीत म्हणण्यापेक्षा त्यांच्या राक्षसी नफे वृत्तीला लगाम घातल्याने त्यांची मस्ती उतरलेली आहे. लोकांनीदेखील घरखरेदीबाबत संयमी धोरण स्वीकारल्याने विचारपूर्वक घरखरेदी होते. आपला कष्टाचा पैसा बिल्डरांच्या हातात देऊन आपली स्वतःची परवड करून घेण्याची नामुष्की अनेक लोकांवर आलेली आहे. आज एकट्या मुंबईमध्ये तब्बल अडीच लाख घरे विक्रीशिवाय पडून आहेत. खरे तर किंमती कमी करून ही घरे विकता येऊ शकतात परंतु दहा दहा वर्षे घरे रिकामी पडून राहिली तरी चालतील. परंतु कमी किंमतीला विकायची नाहीत. इतका नफा या बिल्डरांनी कमावून ठेवलेला असतो. अशा परिस्थितीत रेडीरेकनरचे दर वाढवले गेले असते तर घरविक्रीला आणखीनच फटका बसला असता. आता परवडणाऱ्या घरांसाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे आणि अधिक स्वस्तातली घरे लोकांना मिळवून दिली पाहिजेत. या पार्श्वभूमीवर सरकारला रेडीरेकनरचे दर वाढवू नयेत अशी बुध्दी सुचली हेच मोठे वैशिष्ट्य ठरते. फक्त आता या निर्णयाचा सामान्य माणसाला कसा फायदा होऊ शकेल अशा योजना सरकारने राबवल्या पाहिजेत. बिल्डरांच्या नफेखोरीला आणखी कसा लगाम घालता येईल आणि त्यांच्याकडे पडून असलेला हा घरांचा साठा लोकांना कसा उपलब्ध होईल हे ठरवले गेले पाहिजे. अजूनही घरांच्या किंमती सामान्य माणसाच्या आवाक्यात आलेल्या नाहीत. मुंबई शहर किंवा उपनगर हद्दीत चारशे फुटाचे घर एक कोटीच्या वरच विकले जाते. रेडीरेकनरचा दर आणि बिल्डरांचे हे दर यामध्ये शंभर पट फरक पडतो. म्हणजेच बिल्डरांकडून रेडीरेकनर दराची अक्षरशः खिल्ली उडवली जाते असेच म्हणायला हवे. निदान या प्रकारचा तुलनात्मक अभ्यास करून घरांच्या किंमती आणखी नियंत्रित करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५० टक्के मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More