वृत्तविहार : रिक्षा चालक आणि प्रवासी – eNavakal
लेख

वृत्तविहार : रिक्षा चालक आणि प्रवासी

रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यामध्ये नेहमीच काहीनाकाही कारणावरून खटके उडत असतात. वादाचा मुख्य मुद्दा भाड्याची आकारणी हा तर असतोच शिवाय ज्या ठिकाणी जायचे आहे तिथे नेताना नवीन प्रवाशाला लांबच्या मार्गाने नेण्याचा प्रकार घडतो किंवा अनेक रिक्षांच्या मीटरमध्ये काहीतरी गडबड असते. बऱ्याच वेळेला पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशा मोठ्या महानगरांमध्ये शेअर रिक्षांचा वापर प्रवासी करतात परंतु भाडे घेताना त्यामध्ये वेगवेगळा प्रकार केला जातो. जो लोकांना त्रासदायक ठरतो नेहमीचे प्रवासी असतील तर गोष्ट वेगळी असते मात्र नवीन प्रवाशाकडून जास्त भाडे उकळण्याचा प्रकार केला जातो. याशिवाय भाडे नाकारण्याचा उद्धटपणादेखील प्रवाशांच्या संतापाचे तितकेच मोठे कारण असते. कारण घाई गर्दीच्या वेळेला किंवा उन्हातान्हात, पावसापाण्यात ज्यावेळेला रिक्षाचालक नकार देतात त्यावेळी प्रवाशांमध्ये आणि त्यांच्यात चांगलीच खडाजंगी होते. ही गोष्ट खरी आहे की रिक्षाचालकांना मिळणारे भाडे हे अतिशय तुटपुंजे असते किमान भाडे 18 रुपये जरी असले तरी दिवसभरातून कोणताही रिक्षावाला जास्तीत जास्त 100 प्रवाशांची ने-आण करू शकतो म्हणजेच दिवसाकाठी त्याला 1800 ते 2000 रू. कमाई होत असावी त्यामधून पेट्रोल, डिझेल किंवा गॅसची किंमत वजा केली तर साधारणपणे 1200 ते 1500 रू. प्रत्यक्ष हातामध्ये पडतात याचा अर्थ महिन्याला तीस ते पस्तीस हजाराची कमाई एक रिक्षावाला करू शकतो. आजच्या महागाईच्या दिवसामध्ये चार जणांच्या कुटुंबाला ही कमाई पुरी पडू शकत नाही. म्हणून अनेक रिक्षाचालक अगदी 12-12 तास रिक्षा चालवून जास्तीत जास्त पैसे कमविण्याचा प्रयत्ऩ करीत असतात. त्यांच्याकडून जर प्रवाशांना योग्य सहकार्य मिळाले तर ते निश्चितच ज्यादा कमाई करू शकतील. अलिकडेच नाशिक येथे भाडे नाकारणाऱ्या आणि जास्त पैसे आकारणाऱ्या जवळपास चाळीस रिक्षाचालकांचे परवाने आरटीओकडून रद्द केले गेले. रिक्षा चालवणे हा काही भरपूर पैसा मिळवून देणारा व्यवसाय नाही. अनेक प्रवासी एक दोन रुपयासाठी रिक्षा चालकांशी हुज्जत घालतात. कारण तो सहजपणे ऐकून घेऊ शकेल अशी त्यांना अपेक्षा असते. परंतु इतर व्यापारी किंवा दुकानदार याच लोकांना एकाचवेळी शंभर शंभर रुपयाला गंडा घालतात. त्यांच्याशी हे प्रवासी कधीही भांडताना दिसत नाहीत मुकाट्याने पैसे देऊन मोकळे होत असतात. रिक्षावाल्याला मात्र दोन चार रुपये जास्त देताना त्यांच्या जीवावर येत असते. केवळ आपण फसवले जात आहोत अशी उगाचाच भावना त्यांच्यामध्ये निर्माण होत असते. पण खरी फसवणूक तर मोठमोठे व्यापारीच करीत असतात.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More