वृत्तविहार : रामजन्मभूमी तोडग्याची सुरुवात – eNavakal
लेख

वृत्तविहार : रामजन्मभूमी तोडग्याची सुरुवात

अयोध्येतील राम जन्मभूमी, बाबरी मशिद वादा प्रकरणात न्यायालयाने मध्यस्थ समितीची नियुक्ती करून सर्वमान्य तोडगा काढण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केला आहे. या मध्यस्थांच्या समितीची पहिली बैठक नुकतीच पार पडली. या वादातले जे प्रमुख पक्षकार आहेत त्यांना निमंत्रित केले गेले होते त्यांनी आपले म्हणणे समितीसमोर मांडावे म्हणून संधी दिली गेली. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर मध्यस्थांच्या समितीची ही पहिलीच बैठक म्हणावी लागेल. गेली सत्तर वर्षे ज्या समस्येवर निर्णय होऊ शकलेला नाही किंवा न्यायालयाच्या निर्णयातूनही काहीच निष्पन्न होऊ शकले नाही तोच वाद आता या समस्येशी संबंधित दोन प्रमुख पक्षकारांच्या परस्पर समझोत्यातून संपवण्याचा न्यायालयाचा हा प्रयत्न नक्कीच काहीतरी मार्ग काढणारा ठरेल असे समजायला हरकत नाही. फक्त मध्यस्थांकडून या पक्षकारांना कशी संधी दिली जाते आणिपक्षकार आपली बाजू मांडताना कशी सकारात्मक भूमिका घेतात यावर बरेच काही अवलंबून राहील. पुढच्या आठ आठवड्यामध्ये मध्यस्थांसमोरची सुनावणी संपवून त्याचा निर्णय करायचा आहे. म्हणजेच मध्यस्थांना दोन्ही पक्षकारांचे समाधान होईल. अशा पध्दतीने मार्ग काढावा लागेल. कारण अजूनही दोन्ही पक्षकारांमध्ये पुरेसे एकमत झालेले नाही. कारण ज्याठिकाणी बाबरी मशजिद होती त्याचठिकाणी राममंदिर बांधले गेले पाहिजे हा आग्रह कायम असल्यामुळे ती जागा सोडून अन्य जागेचा उपयोग कसा करायचा हा त्यातल्या वादाचा एक प्रमुख मुद्दा राहू शकेल. जर ती जागा अन्य कोणत्याही धार्मिक कारणांसाठी न वापरता सामाजिक कामांसाठी वापरली गेली. तर फारसा वाद उठवण्याची शक्यता नाही. परंतु त्यासाठी दोन्ही पक्षकार तयार झाले पाहिजेत. भारताच्या एकूण न्यायालयीन इतिहासामध्येसुध्दा या अशा जटील प्रश्नाबाबत न्यायालयाने मध्यस्थ समिती नेमण्याचा पहिलाच प्रकार घडलेला आहे. किंबहुना एक न्यायाधिश आणि बाकी दोन सदस्य अशा मध्यस्थ समितीची नियुक्ती हा प्रकारही भारतात पहिल्यांदाच घडलाआहे.. ही गोष्ट खरीच आहे की राम हा भारतीय समाजाच्या अस्मितेचा विषय आहे. आणि एका राममंदिरासाठी लोकांच्या भावना इतक्या तीव्र असतील तर त्याचे समाधान सन्मानाने शोधले गेले पाहिजे. बाबर हा परकीय आक्रमक होता आणि त्याने बांधलेल्या मशिदीच्या जागेवर किंवा त्या परिसरात पुन्हा आणखी मशिद उभारली जाणे हा काही तोडगा ठरणार नाही. म्हणून उर्वरित जागेचा उपयोग करताना तो अन्य सामाजिक प्रकल्पांसाठी करण्याचा पर्याय पुढे येऊ शकतो.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

लोकसभा निवडणूक विशेष बुलेटीन (23-05-2019)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन ! ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

वंचित आघाडीने अशोक चव्हाण व सुशीलकुमार शिंदेंना हरविले

मुंबई – महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी केला. अशोक चव्हाण यांचा पराभव ‘वंचित’च्या यशपाल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

बंद कर रे टीव्ही!

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, मुंबई अशी जिथे जिथे भाषणे घेतली तेथील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडले. याचा...
Read More
post-image
क्रीडा विदेश

#FrenchOpen फ्रेंच स्पर्धेत जोकोविचला नादाल, फेडररकडून धोका

पॅरिस – येत्या रविवारपासून सुरू होत असलेल्या यंदाच्या वर्षातील दुसर्‍या फ्रेंच ग्रँडस्लॅम अजिंक्यपद स्पर्धेत माजी विजेत्या नोवाक जोकोविचला नादाल-फेडररकडून धोका संभवतो. ही स्पर्धा दुसर्‍यांदा...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : जनतेचे ‘अभिनंदन’ करा  

पुढचा किमान महिनाभर लोकसभा निवडणुकीचे कवित्व चालू राहील. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते हा विजय एकट्या मोदींमुळे कसा मिळाला आणि काँग्रेसचे नेतृत्व कसे...
Read More