वृत्तविहार : राज्यातील दुर्लक्षित कौशल्य      – eNavakal
लेख

वृत्तविहार : राज्यातील दुर्लक्षित कौशल्य     

कौशल्य भारत अशा प्रकारची योजना केंद्र सरकारकडून राबवली जाते. देशभरात अधिकाधिक कौशल्य आधारित उपक्रम राबवले जावेत किंबहुना अधिकाधिक कुशल कारागिर निर्माण व्हावेत. अशा उद्देशाने अनेक प्रकारचे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. आपणच सुरु केलेल्या या योजनेला देशभरात कसा प्रतिसाद मिळतो याचा अंदाज घेण्याकरीता ठिकठिकाणी स्पर्धा घेतल्या जातात. कोणकोणत्या राज्याने कौशल्याधारित कशा प्रकारचे शिक्षण किंवा उपक्रम सुरु केले आहेत. त्याचा आढावा घेण्याचा तो प्रयत्न असतो. नुकत्याच झालेल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक म्हणजे तेवीस पदके मिळवली. देशभरातील सत्तावीस राज्यांमधून चारशे स्पर्धक त्यात सहभागी झाले होते.

महाराष्ट्रातून पंचेचाळीस जणांची निवड झाली होती. एका विशिष्ट तारखेपूर्वी जन्मलेले कोणतेही कुशल कारागिर किंवा आयटीआय झालेले विद्यार्थी अथवा कोणत्याही अभियांत्रिकी शाखेचे पदवीकाधारक त्यात सहभागी होतात. त्यांना ठराविक कालावधीत काही विशिष्ट वस्तू तयार करण्यास सांगितले जाते. आणि अशा या स्पर्धेतून अधिकाधिक चांगली वस्तू म्हणजेच कल्पकता असलेल्या वस्तूंची निवड केली जाते. अशा या कुशलतेला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमात महाराष्ट्रातल्या तरूणांनी बाजी मारली असेल तर ते निश्चितच कौतुकास्पद ठरते. म्हणून याचा अर्थ महाराष्ट्रात कौशल्यविकास योजना उत्तमरीतीने राबवली जाते असे समजण्याच कारण नाही. उलट महाराष्ट्रातील आणि पर्यायाने मराठी माणूस हा कल्पक कौशल्य दाखवणारा किंवा कष्ट करण्याची तयारी ठेवणारा आहे. त्याला योग्य संधी मिळाली तर तो आपली गुणवत्ता किंवा कौशल्य सिध्द करू शकतो. हे या स्पर्धेने दाखवून दिले.

दुर्दैव असे आहे की मराठी तरूणाकडे कौशल्य आणि कष्ट करण्याची तयारी असूनही त्याला योग्य ती संधी मिळत नाही. आज संपूर्ण महाराष्ट्रात अगदी आयटीआय पूर्ण केलेल्या किंवा इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केलेल्या तरूणांची संख्या लाखोच्या घरात आहे. किंबहुना नोकरीच्या शोधात किंवा व्यवसाय सुरु करण्याच्या प्रतिक्षेमध्ये असलेल्यांची संख्या तितकीच मोठी आहे. आज केवळ स्पर्धा असल्यामुळे विद्यार्थी त्यात सहभागी झाले. परंतु आपला हा स्पर्धेतला सहभाग यशस्वी व्हावा आणि आपल्या कौशल्याला अधिक वाव मिळावा अशी त्यांची स्वाभाविक इच्छा असू शकेल. तेव्हा निदान या तेवीस यशस्वी स्पर्धकांपैकी निदान वीस जणांनी जरी स्वत चे व्यवसाय सुरु केले. आणि त्यांना सरकारने अनुदान दिले. तरी त्यांच्या या कष्टाचे चीज झाले असे म्हणता येईल.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

#IPLAuction2019 आयपीएलच्या लिलावास सुरुवात

जयपूर – पुढील वर्षी सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या(आयपीएल) लिलावास सुरुवात झाली आहे. जयपूर येथील हा लिलाव पार पडत आहे. पुढील वर्षी मार्च महिन्याच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

(अपडेट) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणास मराठीतून सुरुवात

कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते कल्याणमध्ये दाखल झाले असून त्यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले आहे. ३३...
Read More
post-image
महाराष्ट्र

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय कर्मचार्‍यांचे 27 डिसेंबरला उपोषण

मुंबई – मुंबईतील वाचन संस्कृती वाढावी म्हणून मेहनत करणार्‍या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कर्मचार्‍यांना गेल्या अनेक वर्षांत वेतनवाढ व बढती मिळालेली नाही. तीन वेळा आंदोलन करूनही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज ठाकरेंना इगतपुरी कोर्टात जामीन मंजूर

इगतपुरी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना इगतपुरी कोर्टात जामीन मंजूर करण्यात आले आहे. २००८ साली परप्रांतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

शेतकरी कर्जमाफी होईपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी

नवी दिल्ली – गेल्या साडेचार वर्षात पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची १ रुपयाही कर्जमाफी केली नाही, असे म्हणत ‘मोदी सरकार जोपर्यंत देशातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही नरेंद्र...
Read More