वृत्तविहार : राजकीय पक्षांचा हडेलहप्पीपणा – eNavakal
लेख

वृत्तविहार : राजकीय पक्षांचा हडेलहप्पीपणा

राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्या हा एक खरे तर राष्ट्रीयदृष्टय़ा अतिशय महत्वाचा विषय आहे. एकीकडे भ्रष्टाचाराचा नायनाट करण्याची भाषा बोलली जाते परंतु दुसरीकडे हे राजकीय पक्षच भ्रष्ट मार्गाने देणग्या मिळवून काळ्या पैशाला प्रोत्साहन देत असतात. आतासुध्दा एका ताज्या आकडेवारीप्रमाणे प्रादेशिक पक्षांना मिळालेल्या एकूण देणग्यांपैकी २५ टक्के देणग्या या अज्ञात स्त्रोतांकडून मिळाल्याचे समोर आले आहे. त्यात कॉर्पोरेट कंपन्यांचा सर्वाधिक सहभाग आहे. या कंपन्या प्राप्तीकर जरी भरत असल्या तरीसुध्दा देणग्या देताना आपले नाव येणार नाही याची ते काळजी घेतात. याचा दुसरा अर्थ असा होतो की त्यांना मिळालेल्या अतिरिक्त नफ्यातून ते हा पैसा राजकीय पक्षांकडे वळवतात परंतु नफा मिळवण्याच्या पध्दतीत नियमांची अंमलबजावणी केली जात नाही. स्वाभाविकपणे देणग्या देण्याची पध्दतीही तितकीशी पारदर्शक नसल्याचे म्हणावे लागते. खरे तर राजकीय पक्षांना मिळणारा सर्व प्रकारचा पैसा हा पारदर्शक असला पाहिजे. जनतेसाठी काम करीत असताना तेवढाही प्रामाणिकपणा जर राजकीय पक्ष दाखवणार नसतील तर त्यांची आश्वासने म्हणजे जनतेची शुध्द फसवणूक ठरते. आज भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाहीवादी देशाचा विकास ज्या गतीने व्हायला पाहिजे त्या गतीने होऊ शकलेला नाही त्याचे महत्वाचे कारण भ्रष्टाचार हेच आहे. काळा पैसा पांढरा करण्याची संधी राजकीय पक्ष उपलब्ध करून देतात. आणि राजकीय पक्ष त्यांना मिळालेल्या पैशाचा हिशोबही सादर करीत नाहीत आता तर नव्या नियमाप्रमाणे कोणी किती देणगी दिली किंवा कोणाकडून किती देणगी मिळाली याचा तपशिल देण्याचे बंधन त्यांनी काढून टाकले आहे. लोकांना प्रामाणिकपणे कर भरण्याचा आग्रह करणारे राजकीय पक्षच आपल्या प्राप्तीचे तपशिल देत नसतील तर त्यांचा हा हडेलहप्पीपणाच ठरतो.

 

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र मुंबई

औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ उभारणार- राज्यपाल

मुंबई- क्रीडा क्षेत्राचा विकास घडविण्यासाठी औरंगाबाद येथे क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची घोषणा आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली. आज गेट वे ऑफ इंडिया...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागेवाडी गावाजवळ ट्रॅव्हल्स जळून खाक

जालना – जालना – औरंगाबाद रोडवरील नागेवाडी गावाजवळ पुण्याहून येणारी ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्याची घटना आज पहाटे साडेपाच वाजता शॉर्ट सर्किटमुळे घडली. सुदैवाने या...
Read More
post-image
News विदेश

पाकिस्तानविरोधात आता अफगाणिस्तानही सरसावला

नवी दिल्ली- काश्मीरच्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानातून रसद आल्याचे पुढे आल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशभरात संताप आहे. पाकिस्तानविरोधात असाच संताप दुसरे शेजारी इराण आणि अफगाणिस्तान...
Read More
post-image
News क्रीडा मुंबई

मंजिरी भावसार ठरली यंदाची ‘मिस मुंबई’

मुंबई – पीळदार सौंदर्यवतींच्या मिस मुंबई स्पर्धेत एफसीटी जिमची डॉ. मंजिरी भावसार विजेती ठरली. गतवर्षी अवघ्या दोन स्पर्धकांमुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. मात्र...
Read More
post-image
News महाराष्ट्र

आश्वासनांची पुर्तता न झाल्यास बहिष्कार घालू! मराठा समाजाचा इशारा

पंढरपूर- आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सकल मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न झाल्यास भाजपवर बहिष्कार घालण्यात येईल,...
Read More