वृत्तविहार : राजकारण्यांच्या सुसाट जिभा – eNavakal
आघाडीच्या बातम्या लेख

वृत्तविहार : राजकारण्यांच्या सुसाट जिभा

वादग्रस्त विधाने करण्यामध्ये भारतीय राजकारण्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. उचलली जिभ लावली टाळ्याला असेच त्यांचे एकूण वर्तन असते. आतादेखील पुण्याजवळच्या पिंपरी येथे गेल्या महिन्याभरात पाच लहान मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या. त्यापैकी दोघांना जीव गमवावा लागला. यासंदर्भात पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी अशा बऱ्याच घटना असतात आपण त्याच्यावर नंतर बोलू अशा प्रकारचे विधान करून इतक्या महत्वाच्या विषयावर उत्तर देणे तर टाळले शिवाय बोलायच्या भरात त्यांना आपण किती असंवेदनशीलपणे बोलत आहोत याचे भान राहिले नाही. एका कार्यक्रमानंतर जाता जाता पत्रकारांनी त्यांना हा प्रश्न विचारला होता परंतु त्याचे महत्व त्यांच्या लक्षात आले नाही. अशा प्रकारची अनेक विधाने प्रत्येक पक्षाच्या राजकारण्यांकडून होत असतात.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीदेखील जीभ अशीच घसरली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांची अतिशय विचित्र तुलना करून त्यांनी आपल्या जिभेला कसा लगाम नाही हे दाखवून दिले. सातत्याने असे प्रकार का घडावेत असा प्रश्न कोणाच्याही मनात निर्माण होऊ शकतो. याची दोनच महत्वाची कारणे आहेत. एक म्हणजे राजकारणामध्ये अमर्याद सत्ता आणि अधिकार उपभोगायला मिळतात. पात्रतेपेक्षा कितीतरी अधिक गोष्टी सहजपणे त्यांच्या पदरात पडतात आणि त्याची एक धुंदी या लोकांच्या वागण्या-बोलण्यातून दिसायला लागते. मग अगदी सरकारी अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यापासून तर मुलुंडच्या एका खासदाराने एका फेरीवाल्याचे पैसे फाडून फेकण्यापर्यंत ही मस्ती पाहायला मिळते. शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे अशा प्रकारची वर्तणूक केल्यानंतर आपल्याला कोणाला तरी जाब द्यावा लागेल याची त्यांना भीती वाटत नसते. पोलिसात जरी तक्रार नोंदली गेली तरी त्याचा काही उपयोग होत नाही. राजकीय दबाव इतका विचित्र पध्दतीने वापरला जातो की, मागे एकदा निवडणूक प्रचारात प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेद वापरून निवडणूक जिंकण्याविषयी वक्तव्य केल्याचे प्रसिध्द झाले होते.

अशी ही आपल्या देशातील राजकारण्यांची मूळ प्रवृत्ती आहे. थोड्या काळामध्ये उदंड पैसा आणि प्रसिध्दी मिळाल्याची फळे असतात आणि ती त्यांच्यापेक्षाही त्यांना निवडून देणाऱ्या सामान्य माणसालाच भोगावी लागतात. राजकारणाचा स्तर इतका खाली आला आहे की, त्याला सामाजिक मूल्ये तर सोडाच परंतु सर्वसाधारण नीतीमत्तेचेही भान उरलेले नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई – कोचिवली एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गोव्याहून मुंबईला जाणारी ही एक्प्रेस इंजिन बिघाडामुळे रत्नागिरीजवळ पाऊण तास करबुडे बोगद्यामध्ये अडकली....
Read More
post-image
आरोग्य देश

बिहारमध्ये मेंदूज्वरामुळे १३२ जणांचा बळी

पाटणा – बिहारमध्ये मेंदूज्वर तापाचा कहर अद्यापही सुरुच असून यामुळे मृतांची संख्या १३२ वर पोहोचली आहे. तसेच इतर रुग्णालयांमध्ये उपचारांविना मृत्यू झालेल्या मुलांची आकडेवारीही अद्याप...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाणीप्रश्नावरून विधानसभेत गदारोळ! १५ मिनिटे तहकूब

मुंबई – अधिवेशनाचा चौथ्या दिवशी आज विधानसभेत पाणीप्रश्नावरून प्रचंड गदारोळ झाला असून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई हवामान

दक्षिण कोकणात मान्सूनचे आगमन

मुंबई – राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी जनता मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होती. त्यामुळे जनतेला आता दिलासा मिळाला आहे. कारण मान्सून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : शिव VS पराग आणि नेहा

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या एक डाव धोबीपछाड या साप्ताहिक कार्यात बरीच भांडणंं, वाद विवाद, आरोप–प्रत्यारोप सुरू आहेत. या टास्कमध्ये जिंकण्यासाठी बिग बॉस...
Read More