वृत्तविहार : रजनीकांत यांचे धक्कातंत्र – eNavakal
लेख

वृत्तविहार : रजनीकांत यांचे धक्कातंत्र

राजकारणाची दक्षिण शैली ही सहसा कोणाच्या लक्षात येत नाही. इथले राजकारण हे इतक्या चित्रविचित्र पध्दतीने चालू असते. की त्याचा अंदाजही बांधता येत नाही. अण्णा द्रमुक पक्षाच्या प्रमुख जयललिता आणि द्रमुकचे सर्वेसर्वा एम करुणानिधी या दोघांच्या निधनानंतर आज तामिळनाडूमध्ये कोणतेही मोठे राजकीय नेतृत्व पाहायला मिळत नाही. ही पोकळी भरून काढण्यासाठीच अभिनेता कमल हसन आणि रजनीकांत हे बाह्या सरसावून बसले आहेत. योग्य संधी मिळताच त्यांना तामिळनाडूचे मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्या दोघांनाही लोकसभा निवडणुकीमध्ये कोणताही रस नाही. पुढच्या कालावधीत तिथल्या विधानसभा निवडणुका होतील. तेव्हा हे दोघेही अभिनेते आपली कलाकारी दाखवतील यातही काही शंका नाही. फक्त ते राष्ट्रीय स्तरावरचे कोणत्या पक्षाचा आढावा घेतात यावर बरेच काही अवलंबून राहील. म्हणजेच लोकसभा निवडणुक काळात एकूणच देशाची आणि तामिळनाडूची राजकीय हवा कोणत्या दिशेने वाहते याचा सध्या ते अंदाज घेत आहेत. कदाचित रजनीकांत यांना हा अंदाज लवकर लक्षात आलेला दिसतो म्हणूनच त्यांनी आपण विधानसभा निवडणुक लढवणार असल्याची घोषणा करून त्यांच्याच चाहत्यांना धक्का दिला आहे. धक्का अशासाठी म्हणावे लागती की तीन महिन्यापूर्वी त्यांनी आपण निवडणुक लढवणारनाही अश प्रकारची भूमिका घेतली होती. पण आता मात्र उघडपणाने घोषणा करून सर्वच शंकांना पूर्ण विराम दिलेला आहे. लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूत काय चित्र असेल हे आज जरी स्पष्ट नसले तरी आतापासून आपली भूमिका स्पष्ट केली तर निर्माण होणाऱ्या नव्या परिस्थितीशी आपल्याला जुळवून घेणे सोपे जाऊ शकेल. असा त्यांचा हेतू
दिसतो. रजनीकांत यांच्या चित्रपटात बऱ्याचवेळेला धक्कातंत्राचा वापर केला जातो. राजकारणातही बहुतेक त्यांनी तेच तंत्र अवलंबलेले दिसते. कमलहसन यांच्यापेक्षा रजनीकांत यांचा चाहता वर्ग मोठा आहे. आतापर्यंत त्यांनी कोणत्याही राजकीय नेत्याची भेट घेतलेली नाही त्याची त्यांना गरजही वाटत नाही. कमल हसन यांनी अरविंद केजरीवाल यांच्यापासून ते राहुल गांधींपर्यंत सर्वांच्याच भेटीगाठी घेतल्या आहेत. त्या तुलनेत
रजनीकांत यांचे वागणे हे अधिक समजूतदारपणाचे वाटते. आता प्रत्यक्ष राजकारणाला ते कसे सामोरे जातात यावर बरेच काही अवलंबून राहील. साधारणपणे कोणताही राजकारणी खूप आधी आपलेपत्ते उघड करीत नसतो. पण रजनीकांत यांनी तशा प्रकारची हडेलहप्पी दाखवलेली दिसत नाही. शक्यतो सर्व डावपेच उघडपणाने खेळायचे. किंवा जिथे जिथे सामान्य माणसाच्या हिताचा प्रश्न येईल तिथे तिथे जर अशा प्रकारची भूमिका त्यांनी ठेवली तर सामान्य माणसाकडूनही त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

गिर्यारोहक अंजली कुलकर्णीचा एव्हरेस्ट शिखरावर मृत्यू

काठमांडू – भारतीय गिर्यारोहक अंजली कुलकर्णीचा एव्हरेस्ट शिखर उतरतांना पाय घसरून मृत्यू झाल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. त्यांचे पती शरद कुलकर्णी देखील त्यांच्या सोबत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई

सीनिअर डॉक्टर्सच्या रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या

मुंबई – वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून मुंबईतल्या नायर रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. पायल सलमान तडवी असं या डॉक्टरचं नाव आहे. ती मूळची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा

श्रीनगर – भारतीय सुरक्षा यंत्राणांच्या हाती मोठे यश आले आहे. जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा सुरक्षा यंत्रणांनी चकमकीत खात्मा केला. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरला पुन्हा भूकंपाचे धक्के

पालघर – मागील अनेक दिवसांपासून भूकंपाचे धक्के सहन करणाऱ्या पालघरमध्ये आजही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही मात्र आतापर्यंत जाणवलेल्या धक्क्यांमुळे...
Read More