वृत्तविहार : मोदींच्या खेळीला शहांचा छेद         – eNavakal
लेख

वृत्तविहार : मोदींच्या खेळीला शहांचा छेद        

दिल्लीच्या रामलीला मैदानावर भरलेल्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पुन्हा राम धून आळवलेली दिसते. तीन राज्यांमधल्या पराभवानंतरही या पक्षाने रामाला निवडणुकीत उतरवण्याचा चंग सोडलेला नाही. परंतु निवडणुकीत केवळ राम मंदिराचा मुद्दा पक्षाला विजय मिळवून देऊ शकत नाही ते वास्तव जर या पक्षाच्या लक्षात आले नाही. तर लोकसभा निवडणुकीतही भाजपावर राम म्हणण्याची वेळ येऊ शकते. कार्यकर्त्यांमध्ये जोष आणि उत्साह निर्माण करण्याकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगळी खेळी खेळत आहेत आणि अमित शहा त्यांच्या या खेळीला जणुकाही छेद देत आहेत असे चित्र दिसून येते. अलिकडेच नरेंद्र मोदी यांची एका खाजगी चॅनलवरून मुलाखत झाली. त्यात त्यांनी अतिशय शिताफीने राम मंदिराचा मुद्दा टोलवला. राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार का असा थेट प्रश्न विचारल्यानंतरही कोर्टाचा निर्णय येईपर्यंत अध्यादेश काढणार नाही. इतक्या स्पष्ट शब्दात त्यांनी त्याचे उत्तर दिले याचा अर्थ राम मंदिर तातडीने उभे राहिले पाहिजे. असे नरेंद्र मोदींना वाटत नाही. त्यांच्या त्या संपूर्ण मुलाखतीचा सत्तर टक्के भाग हा सबका विकास सबका साथ या मुद्दाशीच निगडीत होता.

गेल्या साडेचार वर्षात झालेली विकासकामे एकूणच देशाच्या मानसिकतेमध्ये होत असलेले परिवर्तन शासकीय कारभारामध्ये आलेला वेग अशा अनेक गोष्टी त्यांनी अतिशय विस्तृतपणे त्यांनी सांगितल्या होत्या. खरे तर पक्षाच्या या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांनी पंतप्रधानांचा सबका साथ सबका विकास हाच मुद्दा अधिक प्रभावीपणे मांडायला हवा होता. मोदींनी केलेल्या कामाची केवळ स्तुती करून त्यांनी वेळ मारून नेली. यापेक्षा मोदींच्या कार्यकाळात झालेली विकास कामे प्रत्येक कार्यकर्त्याने कशी घराघरापर्यंत पोहचवली पाहिजे याचे जर त्यांनी मार्गदर्शन केले असते तर ते जास्त संयुक्तिक ठरले असते. त्याऐवजी हा रामराग आळवून त्यांनी कार्यकर्त्यांची बुध्दी भडकवली. असे हे यापूर्वीही झाल्याने ते जाणीवपूर्वक हा उद्योग करीत आहेत की काय असे वाटायला लागते. मोदींच्या प्रतिपादनाविरुध्द त्यांची ही विधाने दोघांमधला छुपा विसंवादही समोर आणतात. आता तर सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्र खंडपीठ स्थापन करून राममंदिराची सुनावणी सुरु केली आहे. यापुढची तारीख 28 जानेवारी असल्यामुळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राममंदिराचा निकाल लागण्याची शक्यता दिसत नाही. अशा परिस्थितीत केवळ न्यायालयावर दबाव निर्माण करण्याकरीता जरी ही खेळी खेळली जात असली तरी त्यातून मतदारांमध्ये नेमका विरुध्द संदेश जातो. आणि मोदींच्या विकासापेक्षा भाजपाला राम मंदिराचा ध्यास जास्त आहे असे वाटू लागते. ज्यातून पक्षाला राजकीय तोटा होण्याचीच जास्त शक्यता आहे.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश न्यायालय

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! ३ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केेंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज दिल्लीतील न्यायालयाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कॉंग्रेसचा गोंधळ समजू शकतो पण शरद पवार तुम्ही? मोदींचा हल्लाबोल

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
Read More
post-image
महाराष्ट्र

टोमॅटोच्या भावात मोठी घसरण; २० किलोच्या कॅरेटला १०० रुपये

मनमाड – खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचे नगदी पीक म्हणून असणारे टोमॅटो पीक शेतकर्‍याची चिंता वाढवू लागली आहे. टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. घाऊक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मलिष्का पुन्हा म्हणतेय, ‘मुंबईssss’

मुंबई – मुंबई…तुला बीएमसीवर भरवसा नाय काय आणि गेली गेली मुंबई खड्ड्यात असे म्हणत मुंबई महापालिकेवर उपहासात्मक टीका करणारी आर जे मलिष्का पुन्हा एकदा...
Read More