वृत्तविहार – मै नही तू…तू… – eNavakal
लेख

वृत्तविहार – मै नही तू…तू…

सध्या देशभर मी टू या मोहीमेची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रामुख्याने मनोरंजन क्षेत्रात महिलांना पुरुष वर्गाकडून होणाऱ्या त्रासाला किंवा जाचाला तोंड फोडले जात आहे. ही गोष्ट शंभर टक्के सत्य आहे की मनोरंजन हे क्षेत्र इतके उथळ, सवंग आणि नीतीमूल्यांची लक्तरे टांगणारे म्हणूनच ओळखले जाते. या क्षेत्रात येऊन कोणीही सत्यवानाचा किंवा सावित्रीचा आव आणू शकत नाही. तिथे असणारा अफाट पैसा, अफाट प्रसिध्दी किंबहुना अफाट लोकप्रियतेच्या लाटेवर मोजल्या जाणाऱ्या नोटा ही या क्षेत्राची सर्वात मोठी ओळख असते.

पैसा आणि प्रसिध्दी हीच या क्षेत्राची ओळख असल्याने ज्याला कोणाला या गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या असतात तो या क्षेत्रात सर्व प्रकारच्या तडजोडी करायला तयार होतो. परंतु महिला अभिनेत्रींना चांगली कामे देण्याच्या मोबदल्यात किंवा सातत्याने चांगल्या नटांबरोबर आणि चांगल्या चित्रपटांमध्ये कामे पटकावण्याकरीता या क्षेत्रात जो काही वागण्या बोलण्यातला मुक्त संचार चालू असतो आणि मग त्यातून कोणाचा तरी पाय घसरतो. अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न होतो. परंतु चित्रपटातले काम आणि त्या क्षेत्रातली आपली प्रतिमा टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने अनेक अभिनेत्री पुरुष वर्गाचा हा अन्याय मुकाटपणे सहनही करतात. या क्षेत्रातही पुरुष प्रधान दादागिरी बऱ्याच प्रमाणात चालते आणि मग नट्यांच्या सौंदर्याचाही गैरफायदा घेण्याचा प्रकार घडतो. या सगळ्या गोष्टी काही खूप अजाणतेपणी होत नाहीत. जाणूनबुजून समजून उमजून त्यातही महिला आपल्या प्रतिष्ठेचा विचार करीत बोलण्याचे टाळत असल्यामुळे हे प्रकार सर्रासपणे वाढतही जातात. म्हणजे आता ज्या काही अभिनेत्रींनी त्यांच्यावर झालेल्या पुरुषी अन्यायाविरुध्द आवाज उठवला आहे. ते निश्चितच एक धाडस आहे यात काही शंका नाही. परंतु त्यांच्या डोळ्यादेखत इतर अभिनेत्रींबाबत प्रकार सर्रासपणे घडत असतो.

केवळ अभिनेत्रीच नाही तर या क्षेत्रातील मॉडेल, इतर काम करणाऱ्या सहकलाकारांनाही हा अनुभव येतो. चित्रपट, नाटक, दूरदर्शन. मोठमोठे कॉर्पोरेट ऑफिसेस अगदी सरकारी कार्यालयांमध्येसुध्दा या पुरुषी अहंकाराचे चित्रविचित्र चटके महिलांना सहन करावे लागतात. आता जर त्याला वाचा फुटत असेल तर ही मोहीम आणखी तीव्र झाली पाहिजे आणि प्रामुख्याने मनोरंजन क्षेत्रामध्ये धुमाकुळ घालणारे हे पुरुषी मुखवटे फाडले गेले पाहिजेत. हे क्षेत्रच इतके निसरडे आहे की तिथे तोल सांभाळणे ही फार मोठी कसरत ठरू शकते. परंतु या गोष्टी अलिकडच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर का घडू लागल्या आहेत याचा विचार झाला पाहिजे. कारण मनोरंजनाचा हा तथाकथित छंद आणि व्यवसाय इतका बोकाळला आहे आणि पाश्चिमात्यांचे अनुकरण करण्याची बेधुंद मस्ती दिसते त्याचे हे परिणाम दिसायला लागतात.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

क्वीन कंगनाच्या ‘मणिकर्णिका’चा ट्रेलर प्रदर्शित

नवी दिल्ली – बॉलीवूडची क्वीन कंगना राणावतच्या बहुप्रतीक्षित ‘मणिकर्णिका; द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईत काही वर्षांत सव्वा तीनशे किमी मार्गावर मेट्रो धावेल – मोदी

कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते कल्याणमध्ये दाखल झाले असून त्यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले आहे. ३३...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

#IPLAuction2019 आयपीएलच्या लिलावास सुरुवात

जयपूर – पुढील वर्षी सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या(आयपीएल) लिलावास सुरुवात झाली आहे. जयपूर येथील हा लिलाव पार पडत आहे. पुढील वर्षी मार्च महिन्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

कल्याणकरांकडून मोदींसाठी गाजराचे तोरण

कल्याण – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले. एकीकडे भूमिपूजनासाठी येणाऱ्या मोदींच्या स्वागतासाठी भाजपाकडून जय्यत तयारी करण्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

मोदींच्या सभेसाठी परिसरातील दुकाने बंद; व्यापारी संतप्त

कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले. मोदी कल्याणमध्ये दाखल होणार असल्याने मोठा सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात...
Read More