वृत्तविहार : मेगाब्लॉकचा असाही विक्रम – eNavakal
लेख

वृत्तविहार : मेगाब्लॉकचा असाही विक्रम

भारताने चंद्रावर यान पाठवून आम्ही आता कुठेही पोहचू शकतो हे सिध्द करून दाखवले आहे. एकीकडे भारताची ही अशी झेप आकर्षित करीत असताना दुसरीकडे महानगरातल्या रेल्वे प्रवाशांना समस्या पार करीत रोज जो चंद्र पाहावा लागतो त्याचा मात्र तितकासा विचार होताना दिसत नाही. याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे मुंबई-पुणे मार्गावरील नेहमीच्या गाड्या तब्बल पंधरा दिवस बंद ठेवण्याची वेळ आली आहे. हा आतापर्यंतचा विक्रमच म्हणावा लागेल. हा प्रकार पहिल्यांदाच होत असावा. मुंबई-पुणे रेल्वे सुरु झाल्यानंतर आतापर्यंत कधीही सलगपणाने इतके दिवस या गाड्या बंद करण्याची वेळ आलेली नव्हती. रेल्वे मार्गांची दुरुस्ती किंवा पावसाळ्यात घाटामध्ये दरडी कोसळण्याचे होणारे प्रकार अशा अनेक कारणांकरीता हा मेगाब्लॉक घेतला जात आहे. प्रश्न असा येतो की चंद्रावर यान पाठवणाऱ्या देशात रेल्वेच्या सुधारणा करण्याकरीता इतका मोठा द्राविडी प्राणायाम करण्याची वेळ येते हेच एक आश्चर्य वाटू लागते. पुणे-मुंबई दरम्यान डेक्कन एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस, किंवा अन्य गाड्यांमधूनही साधारणपणे रोज दहा हजार प्रवासी ये जा करतात. या दहा हजार प्रवाशांचा पंधरा दिवसाचा प्रवास आपण बंद करीत आहोत याची जराशीही खंत रेल्वेला वाटू नये हे एक आश्चर्य म्हणायला हवे. कदाचित या गोष्टींचा रेल्वेने विचार केलाही असेल परंतु ज्या पध्दतीची माहिती प्रसिध्द झाली आहे त्यात या प्रवाशांना मुंबई किंवा पुण्याला येण्याजाण्यासाठी पर्यायी व्यवस्था काय राहील किंवा या गाड्या बंद झाल्यामुळे रस्ते वाहतुकीवर त्याचा काय ताण पडेल याचा खुलासा रेल्वेकडूनच होणे अपेक्षित होते आणि राज्य सरकारने किंवा परिवहन विभागाने ऐन पावसाळ्यात रेल्वेचे हे ज्यादा प्रवासी द्रूतगती मार्गाने येत असतील तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो हेदेखील लोकांना सांगितले पाहिजे किंवा काय काय दक्षता घेणे गरजेचे आहे हेदेखील स्पष्ट केले पाहिजे. दुर्दैवाने तेवढीसुध्दा दक्षता घेतली गेलेली नाही. केवळ गाड्या बंद होण्याच्या बातम्यांना दणदणीत प्रसिध्दी मिळाली पण प्रवाशांचे जे हाल होणार आहेत ते कमी करण्यासंदर्भात काय उपाय केले जाऊ शकतात याचा कुठेही उल्लेख आढळून येत नाही. म्हणूनच चंद्रावर यान पाठवणे हे एकवेळेला सोपे वाटू लागते आणि दररोजची ही पोटाची खळगी भरण्यासाठी केली जाणारी यातायात अधिक कठीण आणि कष्टदायक वाटू लागते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

स्थलांतरित मजुरांप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

नवी दिल्ली – राज्यातील स्थलांतरीत मजुरांनी राज्य सरकारने सर्वतोपरी काळजी घेतली, त्यांना सर्व सोयी-सुविधा दिल्या असं राज्य सरकारचं म्हणणं सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलं आहे. महाराष्ट्र...
Read More
post-image
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

पाणी चित्रपट हातातून गेल्यानेच सुशांत नैराश्येत, शेखर कपूर यांचा खुलासा

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. त्याच्या संपर्कात असलेल्या प्रत्येकाचा जबाब नोंदवला जात आहे. त्याचपार्श्वभूमीवर प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर...
Read More
post-image
देश

शेतकरी सन्मान योजनेचा पुढचा हप्ता १ ऑगस्टला, १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे

नवी दिल्ली – पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये मिळतात. या योजनेत आता १० कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांची नोंदणी झाली...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लोकांना सहभागी करून घ्या, मुख्यमंत्र्यांने आयुक्तांना आदेश

ठाणे – ठाण्यातील रुग्णसंख्या वाढत असून तिकडे व्यवस्थित उपाययोजना आखल्या गेल्या पाहिजेत अशा सूचना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका आयुक्तांना...
Read More
post-image
महाराष्ट्र

नोव्हेंबर अखेरपर्यंत कोरोना संपुष्टात येईल, सत्तेतील नेत्याचा दावा

नगर – कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता कोरोना केव्हा संपुष्टात येईल याबाबत अद्यापही कोणतेही संकेत नसताना ग्रामविकास मंत्री आणि नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नोव्हेंबरपर्यंत कोरोना...
Read More