(वृत्तविहार) माधुरी दीक्षित नेने आणि पुणे – eNavakal
आघाडीच्या बातम्या लेख

(वृत्तविहार) माधुरी दीक्षित नेने आणि पुणे

काही वर्षापूर्वीच देशातल्या तमाम चित्रपट रसिकांच्या दिल की धडकन बनलेल्या माधुरीने आपल्या अदाकारीमुळे मोहित केले होते. ‘हम आपके है कौन…’ इथपासून ते ‘खलनायक’पर्यंत किंवा तेजाब, दिल तो पागल है अशा शेकडो चित्रपटातून तिने अनेक भूमिका केल्या. पण लोकांच्या विशेष लक्षात राहाणारी माधुरी ही ‘खलनायक’ चित्रपटातून देशाच्या कानोकोपऱ्यात पोहचली. त्यातल्या वादग्रस्त गाण्यामुळे तिच्याविषयी निरनिराळ्या प्रकारच्या चर्चाही सुरु झाल्या होत्या पण सौंदर्य आणि अभिनयामुळे लोकप्रिय झालेल्या या माधुरीला हेमामालिनीप्रमाणेच राजकारणात खेचण्याची स्पर्धा सुरु झालेली आहे. सहा महिन्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी माधुरीची तिच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी केवळ समाजातल्या प्रतिष्ठित लोकांशी संवाद साधण्याचा भारतीय जनता पार्टीचा उपक्रम असल्याचे चित्र निर्माण केले गेले होते. परंतु आता आगामी लोकसभा निवडणूकीसाठी कोणकोणत्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरु झालेली आहे. गेल्या वेळेला नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेमुळे निवडणुकीत लाट निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी अपेक्षा नसतानाही भारतीय जनता पार्टीचे अनेक उमेदवार निवडून आले. ही परिस्थिती आता राहिलेली नाही. पुण्यातली लोकसभेची जागा आपल्या हातून जाण्याची भीती पक्षाला वाटू लागली आहे. कारण प्रदेश स्तरावर या पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात अनेक आमदारांची आणि खासदारांची कामगिरी सुमार दर्जाची असल्याचे समोर आले. तेच उमेदवार जर तिथे दिले तर पक्षाला तोटा होऊ शकतो. अशी भीती वाटू लागल्यामुळेच प्रतिष्ठेच्या काही मतदार संघांमध्ये तितक्याच दर्जाचा उमेदवार उभा केला तरच पक्षाला स्थान टिकवता .येईल अशा राजकीय निरीक्षणांचा आढावा घेऊनच पुण्यातून माधुरी दिक्षीत नेनेला पुणे मधून निवडणूक लढवण्याची गळ घातली जात आहे. या वृत्ताला प्रत्यक्ष माधुरी दिक्षीतने अद्याप दुजोरा दिलेला नाही. कदाचित हा मजकूर वाचकापर्यंत पोहचत असताना तिच्याकडून या संदर्भातला होकार किंवा इन्कार प्रसिध्द होण्याची शक्यता आहे. मात्र या वृत्ताने आधीच गुलाबी थंडी पडू लागलेल्या पुणेकरांना आणखीनच उबदार वाटू लागले असावे. राजकीयदृष्टय़ा विचार केला तर ड्रीम गर्ल असलेल्या हेमामालिनीने अनेक वर्ष भाजपाला साथ दिली सलग तीन लोकसभा निवडणुकांमधून ती निवडूनही आली आता ही धकधक गर्ल हाताशी लागावी म्हणून अमित शहा यांनी अपरिमित प्रयत्न केलेले दिसून येतात. 2019 ला संपूर्ण देशातून तीनशेपेक्षा जास्त खासदार
निवडून आणायचे असल्याने एकेक जागा भाजपासाठी महत्वाची आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट उद्धवस्त केल्या प्रकरणी कारवाईचे आदेश

तिरुवनंतपुरम – ‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट सोमवारी उजव्या विचारसणीच्या कट्टरपंथीयांनी उद्धवस्त केल्यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या...
Read More
post-image
देश

विम्याच्या भरपाईचे दावे वाढले; प्रिमिअम वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून विम्याच्या नुकसान भरपाईचे दावे वाढले आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या विमा कंपन्या आपल्या प्रीमियममध्ये २० ते ४० टक्के...
Read More
post-image
देश

TVS मोटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपातीचा निर्णय

नवी दिल्ली  लॉकडाऊनच्या संकटात आता भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात...
Read More
post-image
विदेश

अमेझॉनच्या जंगलातही पोहोचला कोरोना; ९८० आदिवासींना लागण

ब्रासिलिया – कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. पण आता ज्याठिकाणी लोक कधीही उत्स्फूर्तपणे जात नाहीत, तिथे जाणे टाळतात. अशा जंगल भागातही कोरोना पोहोचला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात; पाण्यातून काढले ५०० नारळ

कोल्हापूर – कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात झाली आहे. तलावात तांबट कमान परिसरात पडलेल्या पूजाअर्चेच्या साहित्यामुळे प्रदुषणामध्ये भर पडत होती. त्यामुळे येथे मासे, कासव मृत...
Read More