वृत्तविहार : मराठी भाषेविषयी बेगडी प्रेम – eNavakal
लेख

वृत्तविहार : मराठी भाषेविषयी बेगडी प्रेम

सालाबादाप्रमाणे ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकरांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा झाला. पण नुकत्याच साजऱ्या झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मराठी भाषेच्या विकासासाठी कोणतीही मोठी तरतूद केली गेली नाही. एवढेच नव्हे तरसध्या सुरु असलेल्या अधिवेशनामध्ये या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असाकोणीही प्रयत्न केलेला दिसत नाही. यावरून मराठी भाषेविषयीचे प्रेम कसे बेगडी आहे हेच लक्षात येते. मराठी भाषा शिकविण्याच्या आणाभाका घेतल्या जातात. भाषा ही समाजकारणाचे महत्त्वाचे माध्यम असताना तिला राजकारणाचे साधन बनविले जाते. शिरवाडकरांविषयी आदर व्यक्त करण्याकरिता हा मराठी भाषा दिन साजरा करणे योग्य ठरते. परंतू आज मराठी भाषेची जी काही पीछेहाट सुरू आहे त्याची जबाबदारी घ्यायला कोणीही तयार नाही. कारण मराठी भाषेच्या नावाने गळा काढणारे लोकच आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घालतात. विधी मंडळात लंबी चौडी भाषणं देणारे नेतेदेखील त्यांच्या शिक्षणसंस्थांमध्ये मराठी शाळा बंद करतात आणि इंग्रजी शाळा सुरू
करतात. आतातर इंटरनॅशनल स्कूलच्या नावाने पैसे कमाविण्याचा नवा फंडा निर्माण झालेला आहे. याचा अर्थ मराठी शिकविण्यापेक्षाही तिचा गळा घोटून आपली शिक्षणाची दुकानबारी सुरू ठेवण्याचा या लोकांचा अतिशय स्वार्थी प्रयत्न दिसून येतो. अशावेळी मराठी भाषेविषयी दाखवली जाणारी बेगडी साहानुभूती मराठी माणसाच्याच अपमान करणारी ठरते. शाळांमधून मराठी विषय सक्तीचा करणे आणि राजकारभारामध्ये १००% मराठीचा वापर सुरू करणे अशा मूलभूत उपाययोजना करणे गरजेचे ठरते. दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्ष करून केवळ राजकीय कारणांसाठी मराठी भाषा दिनाचाही उपयोग होत राहतो. जोपर्यंत अशी राजकीय हडेलहप्पी थांबत नाही तोपर्यंत मराठी भाषविषयी खरे प्रेमही व्यक्त होऊ शकत नाही. म्हणून असे म्हणावेसे वाटते की मराठी असे ‘मायबोली परी ती राजभाषा नसे!’ अशी कवीमनाची खंत आज दूर करायची असेल तर राजभाषेबरोबरच ती प्रत्येकाची रोजची व्यवहार भाषाही झाली पाहिजे. बोली भाषा, मातृ भाषा, अभिजात भाषा अशी अनेक विशेषणे वापरत असतो. परंतु ती मायमराठी म्हणून भावनिक भाषा म्हणूनच गौरवली गेली पाहिजे. आज ज्यावेळेला इंग्रजी भाषेविषयी जे आकर्षण दिसून येते ते मायमराठीचा अवमान करणारे आहे. इंग्रजीला आपण मावशीचा दर्जा दिला होता तर तो आज उलट परिस्थिती दिसून येते आणि इंग्रजीला मातृभाषा समजून मराठीला मावशीचा दर्जा दिल्यासारखे वाटू लागते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड

मुंबई – विधान परिषदेतील उपसभापतीपदी अखेर शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रसेचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More