वृत्तविहार : मराठीचा न्यूनगंड कायम – eNavakal
लेख

वृत्तविहार : मराठीचा न्यूनगंड कायम

महाराष्ट्र सरकारला आपल्याच मातृभाषेचे महत्त्व समजत नसेल तर या सरकारच्या बुध्दीची जेवढी कीव करावी तेवढी थोडीच आहे. विशेषतः शिक्षण विभागाने मराठीबाबत जो काही खेळखंडोबा चालवला आहे तो खरोखरच चिंताजनक म्हणावा लागतो. राज्यकारभारात मराठीला पाहिजे तसे स्थान नाही. मंत्रालय स्तरावरचा सगळा व्यवहार हा इंग्रजी भाषेतूनच होत असतो आणि आता बालभारतीच्या पुस्तकामध्ये काही गोष्टी समजावून सांगण्याकरीता इंग्रजी भाषेचा आधार घेण्याची सरकारची मनोवृत्ती म्हणजे आपल्याच मातृभाषेला अपमानित करण्याचा प्रकार ठरतो.

सध्या राज्यभर इंग्रजी शाळा, इंग्रजी माध्यम, इंग्रजी भाषा यांचा प्रचंड धुमाकुळ सुरु आहे. मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत आहेत. मराठी भाषा शिकून कोणाचेही भले होणार नाही. किंवा मराठी भाषेतील शिक्षण हे जगण्यासाठीसुध्दा उपयुक्त नाही. असे वातावरण सरकारी कृपेनेच तयार होत आहे. मराठी विषयीचा न्यूनगंड नाहीसा करण्याऐवजी त्याला खतपाणी घालण्याचे काम जर शालेय शिक्षण विभाग करीत असेल तर या विभागाचाच अभ्यास घ्यायची वेळ आलेली आहे. वारंवार मराठीविषयी राज्याच्या शिक्षण विभागाकडून दुगाण्या धाडल्या जात आहेत. इंग्रजी भाषेचा कितीही प्रभाव असला तरीसुध्दा आपल्या भाषेचा अभिमान न बाळगता इंग्रजीचा आधार घेऊन मराठी समजावून सांगण्याची दुर्दैवी वेळ शालेय शिक्षण विभागावर यावी हे आणखीनच संतापजनक ठरते. आता राज्यातील अनेक शिक्षण संस्था बालभारतीच्या पुस्तकातील या सरकारी उचापतीचा जाहीर निषेध करीत आहे. सरकारने ताबडतोब हस्तक्षेप करून त्या चुका दुरुस्त कराव्यात आणि बालभारतीसारख्या मराठीची उत्तम तयारी करून घेणाऱ्या पुस्तकातून त्याच भाषेचा अधिकाधिक अभ्यास होईल असा प्रयत्न करावा. सध्या अधिवेशन सुरु असल्यामुळे यासंदर्भात काही ना काही गदारोळ होईलच. परंतु त्याला राजकीय रंग न देता निव्वळ मराठी भाषेची उपासना याच दृष्टीकोनातून त्याचा विचार व्हावा. दुर्दैवाने सरकारच्या व्यवहार आणि कृतीमध्ये खूप फरक असल्याचे दिसून येते. मराठी शाळांची वाढ अधिकाधिक मराठीचा वापर, मराठी शिक्षण पूर्ण करणाऱ्यांना प्रोत्साहन असे काही न करता उलट त्याच्याविरुध्द वर्तणूक होताना दिसून येते. याचा निषेध करून काम भागणार नाही. तर प्रत्यक्ष कृती आणि व्यवहार यामध्ये समतोल साधावा लागेल. लोकप्रतिनिधीसुध्दा मराठी भाषेच्या विकासाबाबत किंवा संवर्धनाबाबत उदासिन राहतात. कारण त्यातून कोणताही राजकीय फायदा होत नाही. म्हणूनच लोकदबावातूनच सरकारला वठणीवर आणावे लागेल. यापुढे मराठीच्या नावाने चालणारा अपमानास्पद प्रकार रोखावा लागेल.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

कॉंग्रेस-जेडीएसच्या बंडखोरांचा आज फैसला

नवी दिल्ली – कर्नाटकातील राजकीय नाट्यावर आज निकाल लागण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस आघाडीच्या १५ बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा आज निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज 17 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More