वृत्तविहार : मतदार नोंदणीत उदासिनता – eNavakal
लेख

वृत्तविहार : मतदार नोंदणीत उदासिनता

विधानसभा निवडणुकीसाठी निवडणुक आयोग जय्यत तयारी करून सिध्द असल्याचे दिसते. यावेळी संपूर्ण मुंबईत दहा लाख नवे मतदार नोंदले गेले असल्याची माहिती निवडणुक आयोगाने दिली. याचा अर्थ आयोगाने नवीन मतदार नोंदणीसाठी जी काही मोहीम राबवली त्याला चांगला प्रतिसाद लाभलेला दिसतो. खरे तर यापेक्षाही जास्त मतदारांची नोंदणी होऊ शकली असती. परंतु केवळ निवडणुक आयोगाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन लोकांनी नावे नोंदणी केली. अर्थातच राजकीय पक्षांनीदेखील आपापल्या मतदार संघात मतदार वाढावेत म्हणून जो पुढाकार घेतला गेला त्यामुळेदेखील मतदारांची संख्या वाढलेली दिसते. याच ठिकाणी निवडणुक आयोगाने जर घरोघरी जाऊन किंवा किमान प्रत्येक गृहनिर्माण संस्थेत जाऊन नोंदणीची मोहीम राबवली असती तर त्याला आणखी प्रतिसाद मिळाला असता. मतदान हा लोकशाही व्यवस्थेतला मतदारांना मिळालेला एक मोठा हक्क आहे. फक्त त्या हक्कावर शासकीय शिक्का बसल्याशिवाय त्याचा वापर करता येत नाही. खरे तर हा महत्वाचा हक्क प्रत्येक नागरिकाला सहजपणे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आवश्यक ठरते. निवडणुक आयोगाने त्याबाबतची जबाबदारी योजनापूर्वक पार पाडायला हवी. अजूनही मतदानाची टक्केवारी जर पाहिली तर त्याबाबतची उदासिनता दिसून येते. शंभर टक्के मतदार नोंदणी ज्या दिवशी होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय झाला असे म्हणता येईल. परंतु हे होऊ शकणार नाही कारण मतदार नोंदणीबाबत शासनयंत्रणांकडून केला जाणारा हलगर्जीपणा त्याला कारणीभूत ठरतो. लोकशाही व्यवस्थेत ज्याला सर्वाधिक मते पडतात तो निवडून येतो. खरे तर नोंदलेल्या एकूण मतदारांपैकी ज्याला सत्तर टक्के मते मिळतील. त्यालाच विजयी घोषित केले पाहिजे किंवा ज्याठिकाणी नव्वद टक्के मतदान होईल तीच निवडणुक वैध मानली गेली पाहिजे. कारण तोपर्यंत लोकांनाही आणि सरकारलाही मतदानाचे महत्व लक्षात येणार नाही. ज्याप्रमाणे एखाद्या सरकारविरुध्द विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेण्यासाठी निम्म्यापेक्षा जास्त मतांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे विजयी होणाऱ्या उमेदवाराने नोंदलेल्या मतदार संख्येपैकी साठ सत्तर टक्के तरी मते मिळवली पाहिजेत. परंतु राजकीय लोक स्वतःच्या स्वार्थाआड येणाऱ्या अटी कधीही स्वीकारत नाहीत. उलट निवडणुक न घेता निवडून येण्याची काही व्यवस्था निर्माण झाली तर त्याचेसुध्दा ते स्वागत करतील. हे असे होण्यामागचे कारण म्हणजे निवडणुकीला उभा राहाणारा उमेदवार हा मतदारांशी कधीच प्रामाणिक नसतो. तो केवळ सत्ता उपभोगण्यासाठी उभा राहतो. आणि निवडून आल्यानंतर पाच वर्षे त्याला मतदारांची आठवणही येत नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

दहा जिल्ह्यातून प्रवास करून ते सहाजण पोहचले गावाला

वर्धा – भारतातील सर्व राज्य आणी जिल्ह्यांच्या सीमा बंद असूनही तब्बल दहा जिल्ह्यातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून सहा मजूर आपल्या गावी पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईत ५२६ कोरोनाग्रस्त, ३४ जणांचा मृत्यू

मुंबई – जगभरातील शेकडो देशांमध्ये थैमान घ्यालणाऱ्या कोरोना व्हायरसची भारतातही दहशत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशात सध्या 4,281 कोरोनाग्रस्त असून बळींचा आकडा...
Read More
post-image
महाराष्ट्र

सीईटी बरोबर विद्यापीठाच्या परीक्षा होणार – सामंत

मुंबई – राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठे आणि त्यांच्या अखत्यारीतील महाविद्यालयीन परीक्षेसह सीईटी परीक्षा होणारच आहेत. राज्यातील कोरोना परिस्थिती...
Read More
post-image
देश

तबलिगी जमातच्या संपर्कातील दीड हजार जणांना कोरोना संसर्ग

नवी दिल्ली – देशातील कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 4 हजार 67 इतकी झाली आहे. त्यात तबलिगी जमातच्या संपर्कात आलेल्या दीड हजार जणांचा समावेश आहे....
Read More
post-image
देश

सॅनिटायझरच्या उत्पादन वाढीसाठी उत्तर प्रदेशात 55 कंपन्यांना परवाने

लखनऊ – कोरोनाचे संक्रमण थोपवण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझरचे उत्पादन वाढावे यासाठी उत्तर प्रदेश सरकारने 55 कंपन्यांना नवीन परवाने दिले आहेत. या कंपन्या रोज जवळपास 70...
Read More